Lokmat Agro >शेतशिवार > छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रास सरकारची मंजुरी

छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रास सरकारची मंजुरी

Govt approval for Farmer Skill Development and Training Center of Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रास सरकारची मंजुरी

छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रास सरकारची मंजुरी

इतर कोणत्याही प्रयोजनासाठी सदर जागेचा वापर करता येणार नाही असा आदेशही सरकारकडून देण्यात आला आहे. 

इतर कोणत्याही प्रयोजनासाठी सदर जागेचा वापर करता येणार नाही असा आदेशही सरकारकडून देण्यात आला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने, सी.एस.आर फंडातून शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव परभणी कृषि विद्यापीठाने विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून, कृषि परिषदेस सादर केला होता. सदर प्रस्तावास महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या कृषि परिषदेने १३जुलै २०२३ रोजी झालेल्या १११ व्या बैठकीत मान्यता प्रदान केली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या कृषि तंत्र विद्यालय, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील १५ एकर जमिनीवर, शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी पंजाब नेशनल बँक व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यात होणाऱ्या सामंजस्य कराराचा मसुदा, संदर्भ क्र.४ अन्वये, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या कार्यालयास केला होता. या मसुद्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी देण्यात येणारी जागा ही प्राधान्याने शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वापर करण्यात यावी. इतर कोणत्याही प्रयोजनासाठी सदर जागेचा वापर करता येणार नाही असा आदेशही सरकारकडून देण्यात आला आहे. 

Web Title: Govt approval for Farmer Skill Development and Training Center of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.