Join us

विद्यार्थ्यांना ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित पदवी प्रमाणपत्र, YCM महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 7:55 PM

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आज जवळपास दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

नाशिक  : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आज जवळपास दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून प्रमाणपत्र देणारे मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. 

आज नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 29 वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. वर्षभरात दोन परीक्षा सत्रांमध्ये 662 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिकांचे वितरण 100 टक्के ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. 119 शिक्षणक्रमांच्या परीक्षेत 5 लाख 35 हजार 343 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 114 बायोमेट्रिक प्रमाणित कॅप सेंटरवर 4158 मूल्यमापनकर्त्यांच्या मदतीने ऑन स्क्रिन प्रणालीचा अवलंब करत 26 लाख 29 हजार 30 उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने 30 दिवसांच्या आत सर्व निकाल  जाहीर करण्यात आला. तर आजच्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातर्फे एक लाख 55 हजार 607 पैकी पदविकाधारक 17 हजार 873, पदव्युत्तर पदविकाधारक 119, पदवीधारक 1 लाख 9 हजार 101, पदव्युत्तर पदवीधारक 28 हजार 626, पी एच डी धारक व एम फीलधारक 7  स्नातकांना पदवी प्रदान 

दरम्यान यावर्षी 4 लाख 82 हजार 311 विद्यार्थ्यांनी विद्यापीठात विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेतले आहे. मागच्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या अॅकेडमिक बॅंक ऑफ क्रेडिट्समध्ये आजपर्यंत 6 लाख 27 हजार 416 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अतिशय सुरक्षित आणि कुठल्याही प्रमाणपत्रावरील मजकुरात बदल होऊ न शकणारे ब्लॉकचेनवर आधारित क्यूआर कोड असलेले पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यासाठी ब्लॉकचेन तंत्राचा वापर करणारे महाराष्ट्रातील आपले पहिले विद्यापीठ आहे. तसेच विद्यार्थ्यांना ई-सुविधा मोबाईल अॅपद्वारे प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी डाऊनलोड करता येणार आहे.

आगामी काळात महत्वपूर्ण प्रकल्प 

यशवंतराव चव्हाण विद्यापीठ मुख्यालयात विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. तसेच इंटिग्रेटेड टिचर एज्युकेशन शिक्षणक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली आहे. एनसीटीईची मान्यता मिळाल्यावर हा शिक्षणक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी विद्यापीठ परिसरात संग्रहालय स्थापन करण्याचे आम्ही ठरविले आहे. भारत सरकारने विद्यापीठ परिसरात यासाठी इमारत बांधण्यासाठी नुकतेच अडीच कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी विद्यापीठ परिसरात संग्रहालय स्थापन करण्याचे ठरविले आहे. भारत सरकारने विद्यापीठ परिसरात इमारत बांधण्यासाठी नुकतेच अडीच कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे.

टॅग्स :नाशिकशेती क्षेत्रविद्यापीठ