Join us

शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणालींसाठी राष्ट्रीय परिसंवाद

By बिभिषण बागल | Published: August 21, 2023 5:05 PM

“अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दिनांक २२-२३ ऑगस्ट २०२३ रोजी बारामती येथील राष्ट्रीय अजैविक तान व्यवस्थापन संस्थेमध्ये होणार आहे.

भारतीय कृषि संशोधन परिषद-राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती; कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटी फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च ऑन अबायोटिक स्ट्रेस (SARAS), “अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दिनांक २२-२३ ऑगस्ट २०२३ रोजी बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये होणार आहे.

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने हे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रमुख उद्दिष्ट प्रतिष्ठित शास्त्रज्ञ, संशोधक, विद्वान, शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाला एकत्र आणून भरड धान्यांवरती होणऱ्या संशोधनाबाबत एकत्रित चर्चा करून येत्या काळात होणार्‍या वातावरणीय बदलांसारख्या आव्हानांना तोंड देणे असे आहे. हा परिसंवाद भरड धान्य उत्पादकता आणि गुणवत्तेवर अजैविक ताणांचा प्रभाव शोधण्यासाठी आणि भरड धान्य उत्पादन वाढवू शकणाऱ्या धोरणात्मक गोष्टी प्रस्तावित करण्यासाठी एक व्यापक संवाद असेल.

हे संम्मेलन चार प्रमुख तांत्रिक सत्रांमध्ये विभागले असून यात भरड धान्य उत्पादकतेवर विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित केलेली आहेत तसेच विविध शास्त्रज्ञ आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या शोध प्रत्रांचे सादरीकरण होणार आहे. या चर्चासत्रासाठी विविध राज्यांमधून शास्त्रज्ञ, धोरणकर्ते, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांसह ३५०-४०० प्रतिनिधींच्या अपेक्षित सहभागासह, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोगासाठी बौद्धिकदृष्ट्या एक उत्तम व्यासपीठ असल्याचे निर्धारित केले आहे. या शिवाय भरड धान्याशी निघडीत असे छोटे प्रदर्शन डेलहिल आयोजित कण्यात येत आहे.

या सोहळ्याला विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. हिमांशू पाठक, सचिव कृषि अनुसंधान व शिक्षण विभाग, कृषि मंत्रालय, भारत सरकार आणि महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) हे प्रमुख पाहुणे म्हणून चर्चासत्राचे उद्घाटन करतील. तसेच महाराष्ट्र सरकारच्या राज्य कृषी विभागाचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे उपमहासंचालक (NRM) डॉ. एस के चौधरी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, विविध संशोधन संस्थांचे संचालक यांचाही सहभाग असेल. डॉ. सम्मी रेड्डी, संचालक, एनआयएएसएम, बारामती यांनी वैज्ञानिक समुदाय व इतर सलंग्न मान्यवरांसाठी भरड धान्य आधारित उत्पादन प्रणालीच्या प्रगतीसाठी सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. 

टॅग्स :शेतीशेतकरीबारामतीकृषी विज्ञान केंद्रशेती क्षेत्र