Lokmat Agro >शेतशिवार > Grapes Conference : द्राक्ष बागायतदार संघाची आजपासून तीन दिवस 'द्राक्ष परिषद'

Grapes Conference : द्राक्ष बागायतदार संघाची आजपासून तीन दिवस 'द्राक्ष परिषद'

Grapes Conference 'Draksha Parishad' for three days from today. | Grapes Conference : द्राक्ष बागायतदार संघाची आजपासून तीन दिवस 'द्राक्ष परिषद'

Grapes Conference : द्राक्ष बागायतदार संघाची आजपासून तीन दिवस 'द्राक्ष परिषद'

Grapes Conference : पुण्यातील टीपटॉप हॉटेल येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Grapes Conference : पुण्यातील टीपटॉप हॉटेल येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Grapes Conference :  महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे यांच्या वतीने यंदाची द्राक्ष परिषद आजपासून पुढीत तीन दिवस आयोजित करण्यात आली आहे. पुणे येथील टीपटॉप हॉटेलमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटनासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार  उपस्थित रहणार आहेत.

दरम्यान, या परिषदेमध्ये तांत्रिक चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. द्राक्ष निर्यातीमध्ये असलेल्या संधी, निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन, नवीन द्राक्षाच्या जाती, द्राक्षातील शरीर विकृती आणि उपाययोजना, युरोपीयन बाजारपेठेतील भारतीय द्राक्षांना संधी या विषयावर पहिल्या सत्रात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

दुसऱ्या सत्रामध्ये जमिनीचे आरोग्य, हवामानातील बदल आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापन या विषयावरील चर्चासत्रांचे आयोजन करणअयात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी द्राक्ष पिकाचे संरक्षण आणि शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भाच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य, पाणी आणि द्राक्षबागांचे व्यवस्थापन, खते व्यवस्थापन आणि द्राक्ष निर्यात, पिक संरक्षण आणि द्राक्ष व्यवस्थापन या विषयावरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

तर तिसऱ्या दिवशी द्राक्षांवर प्रक्रिया आणि विपणन, द्राक्षाचे नवीन वाण, निर्यातीमध्ये असलेल्या संधी, पिक संरक्षण आणि हवामानाचा अंदाज या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर एकूणच शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोदन या परिषदेमध्ये करण्यात आले आहे.   

Web Title: Grapes Conference 'Draksha Parishad' for three days from today.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.