Join us

आगाप छाटणी घेतल्यामुळे तासगावच्या या शेतकऱ्याची द्राक्ष बाजारात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 2:41 PM

ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सावळज (ता. तासगाव) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार अंकुश सदाशिव माळी यांची सुपर सोनाका जातीची आगाप छाटणी घेतलेली द्राक्ष बाजारात विक्रीसाठी आली आहेत.

ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सावळज (ता. तासगाव) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार अंकुश सदाशिव माळी यांची सुपर सोनाका जातीची आगाप छाटणी घेतलेली द्राक्ष बाजारात विक्रीसाठी आली आहेत.

माळी यांनी जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागेतील सुपर सोनाका जातीच्या द्राक्षांची सध्या विक्री चालू असून, चारशे दहा रुपये पेटी (चार किलो) दलालांनी सावळज येथील द्राक्ष विक्रेते विठ्ठल नांगरे पाटील यांच्यामार्फत द्राक्षे खरेदी केली आहेत.

अंकुश माळी म्हणाले, वातावरणातील बदलामुळे चालू वर्षी आगाप छाटणी घेऊन ही द्राक्ष मालात घट होऊन नुकसान झाले.

सुपर सोनाका वाणाच्या दीड एकर बागेत पंचवीस टन द्राक्षे अपेक्षित होती. मात्र, वातावरणाच्या बदलामुळे उत्पन्नात घट झाल्याने दहा टन द्राक्ष माल निघेल, मात्र यंदा द्राक्ष मालास चांगला दर मिळाला आहे.

वातावरणातील सततच्या बदलाचा फटका प्रत्येकवेळी बसतो, तरीही धाडसाने जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतली. पाऊस व ढगाळ हवामान दररोज असूनही परिश्रमपूर्वक बाग जगविली, अपेक्षित उत्पन्न जरी मिळाले नसले, तरी घेतलेल्या श्रमाचे चीज झाले आहे. - अंकुश माळी, सावळज, द्राक्ष बागायतदार

टॅग्स :द्राक्षेमकाशेतकरीसांगलीशेतीदिवाळी 2024बाजार