Lokmat Agro >शेतशिवार > Green Chili and Orange Export : मिरचीचे देठ लवकर सुकत नसल्याने आखाती देशात मागणी

Green Chili and Orange Export : मिरचीचे देठ लवकर सुकत नसल्याने आखाती देशात मागणी

Green Chili and Orange Export : Demand in Gulf countries as chili stalks do not dry quickly | Green Chili and Orange Export : मिरचीचे देठ लवकर सुकत नसल्याने आखाती देशात मागणी

Green Chili and Orange Export : मिरचीचे देठ लवकर सुकत नसल्याने आखाती देशात मागणी

Green Chili and Orange Export : बुलढाण्यातील मिरची आणि संत्राला परदेशातून मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अर्थकाराणाला मोठा हातभार लागत आहे.

Green Chili and Orange Export : बुलढाण्यातील मिरची आणि संत्राला परदेशातून मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अर्थकाराणाला मोठा हातभार लागत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Green Chili and Orange Export : 

बुलढाणा जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्यामध्ये मिरची आणि फळांमध्ये संत्र्यांची परदेशात निर्यात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागण्यास सुरूवात झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, संत्रा, मिरची, फळपिके व सोयाबीनपासून बनविलेले खाद्यपदार्थ तयार होतात. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. 
बुलढाणा जिल्ह्यात फळपिकांचे क्षेत्र हे १२ हजार ०४९ हेक्टर आहे. 
यापैकी निम्म्या क्षेत्रावर संत्रा घेतला जातो. संत्रा या प्रामुख्याने बांगलादेशात निर्यात केल्या जातात. इंदूर येथील व्यापारी हे खरेदी करून परदेशात पाठवितात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत उत्पादित होणाऱ्या संत्र्याला चांगली मागणी आहे. तेलबिया निर्यातीचेही प्रमाण आता चांगलेच वाढले आहेत.

पिकाचे क्षेत्र हेक्टरमध्ये
संत्रा          ५,४९४
कापूस       १,९४,९२९
सोयाबीन     ४,१८,१२८


मिरचीलाही मोठी मागणी 
बुलढाणा जिल्ह्यात धाड परिसरात, तसेच लगतच्या मराठवाड्याच्या पट्ट्यात उत्पादित होणारी मिरची ही प्रामुख्याने आखाती देशात पाठविण्यात येते. या भागात आलेल्या मिरचीचे देठ हे लवकर सुकत नाहीत. त्यामुळे निर्यातीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दुवा असल्याने जिल्ह्यातून ही मिरची विकत घेत व्यापारी तिची आखाती देशात दुबईसह अन्य ठिकाणी निर्यात करतात. त्याचा या भागातील शेतकऱ्यांनाही लाभ होत आहेत.

या देशात होते निर्यात 
बांगलादेश, नेदरलँड, युके, सिंगापूर, कुवेत, केनिया, सं.अरब अमिरात, ब्राझील, श्रीलंका यासह अन्य देशांत बुलढाणा जिल्ह्यात उत्पादित कृषी माल, तथा उत्पादने आणि बियाण्यांची निर्यात होते.

कापूस गाठीची निर्यात 
दरवर्षी जिल्ह्यातून ९० कोटी रुपायांच्या कापूसगाठी या बांगलादेशमध्ये निर्यात केल्या जातात. सोयाबीनपासून बनलेली उत्पादनेही बुलढाणा जिल्ह्यातून निर्यात होतात. तेलबिया निर्यातीचेही प्रमाण चांगले आहे.
 

Web Title: Green Chili and Orange Export : Demand in Gulf countries as chili stalks do not dry quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.