Join us

पाऊस पडत नसल्याने मंचर परिसरात भुईमूग काढणी सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 3:14 PM

भुईमूग शेंगांना मिळतोय चांगला बाजारभाव, मात्र पावसाने दडी मारल्याने मंचरच्या शेतकऱ्यांना काळजी

पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उशिरा लागवड झालेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी अंतिम टप्प्यात असून पाऊस पडत नसल्याने शेतकरी भुईमूग पिकाची काढणी करत आहेत.

जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसाचे वातावरण कधीतरी होते. मात्र इतर वेळेस कडक ऊन पडल्याचा अनुभव येत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल पाणीसाठ्यात फारशी वाढ होत नाही.

झाला आहे. डिंभे धरणात खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. दरम्यान उन्हाळी भुईमूग पीक आंबेगाव तालुक्यात अनेक शेतकरी घेत असतात. मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्याने उशिरा लागवड झालेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी  शेतात सुरु आहे.

अनेक शेतकरी उन्हाळी भुईमूग क्षेत्रात वाढ झाली आहे. बहुतेक वेळा पिकाची लागवड उशिरा करतात. मे महिन्यात भुईमूग पिकाची काढणी परिणामी काढणीसाठी उशीर केली जाते. मात्र नगदी पिके घेऊन झालेल्या भुईमुगाची काढणी शेतकरी करत आहे. पाऊस पडत नसल्याने हे काम सोपे झाले आहे. शेतात भुईमुगाची काढणी करून तेथेच शेंगा तोडत असल्याचे दिसून येत आहे. ओल्या भुईमूग शेंगाला चांगला बाजारभाव मिळत आहे. शिवाय भुईमूग पाल्याचा जनावरांचे खाद्य म्हणून उपयोग होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणारे हे पीक आहे. 

जुलै महिन्यात पावसाची सरासरी भरून निघेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पहिला आठवडा सरला तरी पाऊस पडत नाहीये. येत्या आठ दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.  ऐन पावसाळ्यात नगदी पिके वाचवण्यासाठी त्यांना पाणी भरण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊसकाढणीशेतकरी