Lokmat Agro >शेतशिवार > गटशेती करणाऱ्यांना मिळणार मोफत फळांची रोपे; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

गटशेती करणाऱ्यांना मिळणार मोफत फळांची रोपे; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

Group farmers will get free fruit seedlings; Appeal to maximum farmers to participate | गटशेती करणाऱ्यांना मिळणार मोफत फळांची रोपे; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

गटशेती करणाऱ्यांना मिळणार मोफत फळांची रोपे; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना पानी फाउंडेशन व सेट्रिज संस्थेमार्फत मोफत वृक्ष दिले जाणार आहेत. फळबाग शेती वाढावी या प्रमुख हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांना पानी फाउंडेशन व सेट्रिज संस्थेमार्फत मोफत वृक्ष दिले जाणार आहेत. फळबाग शेती वाढावी या प्रमुख हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सत्यमेव जयते फार्मर कपमध्ये सहभागी गटातील शेतकऱ्यांना पानी फाउंडेशन व सेट्रिज संस्थेमार्फत मोफत वृक्ष दिले जाणार आहेत. फळबाग शेती वाढावी या प्रमुख हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या फळबाग लागवड योजनेत सहभागी व्हावे, यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण घेतल्याची माहिती पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी दिली आहे.

सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेअंतर्गत आयोजित गटशेतीद्वारे आपले उत्पन्न वाढवणाऱ्या व खर्च कमी करणाऱ्या गटांना चालना देण्यासाठी विविध फळांची रोपे मोफत दिली जाणार आहेत. यामध्ये आंबा, चिकू, मोसंबी, संत्रा, लिंबू, सीताफळ, जांभूळ, पेरू इत्यादी फळांच्या रोपांचा समावेश करण्यात आलेला आहे. बांधावर लागवड करायची असेल तर मोहगणी व सागाची रोपेही मोफत दिली जाणार आहेत.

गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळपिकांची लागवड करून पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन पैसा देणारी फळपिकांची लागवड करावी, असे आवाहन संतोष शिनगारे यांनी केले आहे. एकत्रित फळबाग लागवड करण्यासाठी या गटांना एकदिवसीय प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

२२०० शेतकऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांनी खड्डे खोदायला सुरुवात केली असून, लवकरच रोपे लागवड करण्यात येणार आहेत. रोपांसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. रोपांचा खड्डा कसा खोदावा, तो कसा भरावा, रोपांची लागवड कशी करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

लवकरच फळपिकांवर आधारित विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने ऑनलाइन डिजिटल शेतीशाळाही सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी पानी फाउंडेशन व सेट्रिज संस्थेमार्फत एक लाख रोपे लागवड करून ते जगवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सर्वांनी नियोजन करावे, असे आवाहन पानी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, सीईओ सत्यजित भटकळ यांनी केले आहे.

यांचा असेल सहभाग

पहिल्या टप्प्यातील प्रयोगासाठी बीड जिल्ह्यातील बीड, केज, धारूर, अंबाजोगाई, आष्टी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री व बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पानी फाऊंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत सहभागी शेतकरी गटांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

Web Title: Group farmers will get free fruit seedlings; Appeal to maximum farmers to participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.