Join us

Guava Theft : रात्री व्यापाऱ्यासोबत सौदा अन् सकाळी झाडांवरील २ टन पेरूचं गायब; पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:19 AM

शेतकऱ्याने रात्री तैवान जातीच्या पेरूचा ६० रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यासोबत सौदा केला. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यासोबत शेतकरी बागेत गेले असता कष्टाने पिकवलेला एका एकरातील सुमारे एक हजार झाडांवरील सुमारे १.२५ लाख रुपयांचा दोन टन पेरूचा माल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी, २९ सप्टेंबर रोजी सकाळी नरळेवाडी (ता. सांगोला) येथे उघडकीस आला.

सांगोला : शेतकऱ्याने रात्री तैवान जातीच्या पेरूचा ६० रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यासोबत सौदा केला. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यासोबत शेतकरी बागेत गेले असता कष्टाने पिकवलेला एका एकरातील सुमारे एक हजार झाडांवरील सुमारे १.२५ लाख रुपयांचा दोन टन पेरूचा माल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी, २९ सप्टेंबर रोजी सकाळी नरळेवाडी (ता. सांगोला) येथे उघडकीस आला.

याबाबत अण्णासाहेब आप्पाराव शिंदे (रा. नरळेवाडी) या शेतकऱ्यांनी सांगोला पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली आहे.

याबाबत नरळेवाडी येथील अण्णासाहेब शिंदे या तरुणाने मुंबई येथील सिनेसृष्टीतील व्यवसाय सोडून कोरोना काळात गावी आला. गावी आल्यानंतर त्यांने वडिलोपार्जित सुमारे २२ एकर शेतीची मशागत करून सुधारणा केली. शेतीत केळी, केशर आंबा, ऊस, मका त्याचबरोबर दीड वर्षापूर्वी तैवान जातीच्या पेरूची एकरात सुमारे एक हजार झाडांची लागवड केली.

गेले दीड वर्ष सुमारे २.२५ लाख रुपयांची रासायनिक खते, महागडी औषधे फवारणी करून मोठ्या कष्टाने बाग जोपासल्याने पेरूची झाडे फळांनी लगडलेली होती. त्यामुळे अण्णासाहेब हे पेरूच्या विक्रीसाठी व्यापाऱ्याच्या शोधात होते.

दरम्यान, शनिवारी रात्री त्यांनी व्यापाऱ्यासोबत सौदा करून प्रतिकिलो ६० रुपये दराने पेरूची विक्री केली होती. दरम्यान, रविवारी सकाळी व्यापाऱ्यासोबत आण्णासाहेब बागेत गेला असता झाडाला पेरू नसल्याचे पाहून व्यापाऱ्याने तुम्ही तर मला झाडाला पेरूचा भरपूर माल आहे, जास्त बॉक्स घेऊन या म्हणून बोलला होता.

बागेत तर झाडाला पेरूचे फळच दिसत नाही असे म्हणताच शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांनी झाडांची आजूबाजूला पाहणी करीत संपूर्ण बागेचा फेरफटका मारला असता झाडांवरील सुमारे दीड ते दोन टन पेरूचा माल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.  

टॅग्स :शेती क्षेत्रसांगोलापोलिसशेतकरीबाजार