Join us

हिंगोली केव्हीकेच्या कृषी विज्ञान मंडळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:29 PM

या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांनी त्यांचे प्रश्न मांडले यामध्ये कापसामधील मावा व तुडतुडे यांचे नियोजन कसे करावे, शेंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे.

कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, ता. कळमनुरी जि. हिंगोली कृषी विस्तार उपक्रमाच्या अंतर्गत कृषी विज्ञान मंडळाची दुसरी आढावा बैठक संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन हरित क्रांतिचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. 

या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र तोंडापुरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी सादरीकरण करत असताना कृषी विज्ञान मंडळची कार्य पद्धती, उदेश, कामे उपस्थित सर्व कृषी विज्ञान मंडळाचे प्रतिनिधींना समजावून संगितले व कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने आपण शेती करावी व आजच्या बैठकी मध्ये मिळालेली माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे सागितले. या बैठकी मध्ये श्री. राजेश भालेराव विषय विशेषज्ञ (कृषी विद्या) यांनी सोयाबीन, कापूस व तूर पिका मध्ये शास्त्रीय पद्धतीने पिक व्यवस्थापन करावे व पावसाचा अंदाज घेऊन खत व्यवस्थापन करणे गरजेचं आहे असे सांगितले. त्याचबरोबर प्रा. अजयकुमार सुगावे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) यांनी सोयाबीन मध्ये मर, शेंड आळी चे व्यवस्थापन कसे करावे, कापसा मधील मावा, तुडतुडे यांचे नियोजन, हुमणी या किडीचे व्यवस्थापन या विषयाची सविस्तर माहिती दिली व कीडीचे एकात्मिक व्यवस्थापन कृषी विज्ञान केंद्राच्या सल्याने करावे असे आव्हान त्यांनी केले.  

श्री. साईनाथ खरात विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) यांनी सोयाबीन व तूर पिकामध्ये एकात्मिक अन्य द्रव्य व्यवस्थापन, शिफारसीनुसार रासायनिक खत मात्रा याचे योग्य नियोजन कसे करावे आणि जमिनीचा पोत सुधारण्याकरिता अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा असे सांगितले.

डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेल्या मोबाइल ऍपची माहिती देऊन  कृषी विज्ञान मंडळाची स्थापना लगतच्या गावामध्ये करावी असे आवाहन केले. डॉ. कैलास गिते कार्यक्रम सहायक, (पशु विज्ञान) यांनी दुधाळ जनावरातील एकात्मिक कीड नियंत्रण, पशु खाद्य म्हणून आझोला चा वापर, शेळ्या मध्ये चाटण विटाचा वापर व परस बागेतील कुकुटपालन या विषयी  मार्गदर्शन केले. 

या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांनी त्यांचे प्रश्न मांडले यामध्ये कापसामधील मावा व तुडतुडे यांचे नियोजन कसे करावे, शेंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे, सोयाबींनचे पान पिवळं पडण्याची कारणे, मुरमाड जमिनीचे व्यवस्थापन, गायीमध्ये लसीकरण कधी व कोणते करावे, गुरा मध्ये गालफुगीचे कारण, कापूस/सोयाबीन/तूर यांची खत व्यवस्थापन, हळद वरील करपा नियोजन व इतर सर्व प्रश्नांचे निरासन संलग्न तज्ज्ञांकडून करण्यात आले. बैठकीस उपस्थित सर्व शेतकऱ्यांना ट्रायकोडर्म व जिवामृत वाटप करण्यात आले. 

    या बैठकीमध्ये मनोगत करताना श्री. शिवाजीराव गडदे (हत्ता नाईक) यांनी कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, कृषी विस्तार उपक्रमाच्या अंतर्गत कृषी विज्ञान मंडळाची बैठकीमध्ये मिळणारे मार्गदर्शन सध्यास्थिति खूप गरजेचे आहे व या महिती चा प्रसार व प्रचार गावामध्ये करू असे त्यांनी संगितले . श्री. रवी मुंडे (हिवरा) यांनी कृषी विज्ञान मंडळानी गावचा विकास होईल व शेती निगडीत समस्यांचे निराकरण करण्यास मदत मिळेल असे सांगितले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विजय ठाकरे (कार्यालयीन अधीक्षक), श्री. शिवलिंग लिंगे, प्रक्षेत्र व्यवस्थापक  सौ. मनीषा मुंगल, संगणक तज्ञ ,  श्री. गुलाबराव सूर्यवंशी, श्री. संतोष हाणवते, श्री. प्रेमदास जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले व त्याच बरोबर शेख आफ्रिन, साई आणि मारोती कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या बैठकी मध्ये कृषी विज्ञान मंडळाचे प्रतींनिधी यामध्ये हत्ता नाईक, कोठारी, हिवरा, ताकतोडा, भोसी, खांबाळा, जामगव्हान, भोसी, पुयणी, गणेशपूर, वारंगा, तोंडापुर तांडा, चुंचा, धानोरा, मुंढल, शेंनोडी, दात्ती, वरुड, भाटेगाव, शिवणी बू, पोटा, इंचगाव, महिसगवाहन व वाई गावातील सदस्य उपस्थित होते. या कृषी विस्तार उपक्रमाच्या बैठकीचे आयोजन, सूत्रंसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) यांनी केले.  

टॅग्स :शेतकरीशेतीलागवड, मशागत