Lokmat Agro >शेतशिवार > जलसंधारण आणि हायटेक कृषी तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण

जलसंधारण आणि हायटेक कृषी तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण

Guidance training to farmers on water conservation and hi-tech agricultural technologies | जलसंधारण आणि हायटेक कृषी तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण

जलसंधारण आणि हायटेक कृषी तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण

दिनांक १३ आणि १४ सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. 

दिनांक १३ आणि १४ सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. 

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव जिल्ह्यातील जैन हिल्स येथे दिनांक १३ आणि १४ सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व आत्मा (आत्मनिर्भर कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. 

या प्रशिक्षण वर्गात नांदगाव तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते. ज्यामध्ये मौजे नवसारी, मोहेगाव, नांदूर, धनेर, मांडवड, वाखारी, मळगाव, आणि टाकळी बु. यांचा समावेश होता. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना पिकांचे पाणी व्यवस्थापन, हायटेक कल्टीवेशन, कांदा व फळप्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले. 

प्रशिक्षणाचे पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना जैन हिल्स जळगाव येथील विविध प्रकल्पांची ओळख करून देण्यात आली. यावेळी जळगाव प्रतिनिधी अविनाश इंगळे यांनी इरिगेशन कं. लि स्थापनेबाबतची पार्श्वभूमी व कंपनी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध केळी व डाळींब, मोसंबी, स्ट्रॉबेरी व इतर पिकांच्या उती संवर्धन प्रकल्प, ठिंबक व स्प्रिंकलर इन्स्टाॅलेशन संच सिस्टीम, फिल्टर चे प्रकार, पाईप फिटींगचे प्रकार व सोलर सिस्टीम प्रकार, कांदा प्रक्रिया उद्योग, मसाला उत्पादन, फळप्रक्रिया उत्पादने, पेरु, डाळींब, केळी, आद्रक, हळद, मोसंबी आंबा, इ. पिक लागवड तंत्रज्ञान व काढणीपश्चात व्यवस्थापन व्हर्टीकल फार्मिंग, ऊती संवर्धन प्रयोगशाळा, आंबा फळप्रक्रिया युनीट इत्यादी प्रकल्पांशी शेतकऱ्यांची  भेट घडवून उपक्रमाविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

त्यांनंतर दुसऱ्या दिवशी टाकरखेडा येथे उभारणी केलेल्या शेडनेट हाऊस मधील केळी, मोसंबी, आंबा हार्डनिंग प्रकल्पास भेट देऊन तेथील रोपांची विरळणी व हाताळणी याविषयी जोशी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी जैन पाईप, ठिंबक व स्प्रिंकलर मॅन्युफॅक्चरींग प्लांट बद्दल शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घडवून मार्गदर्शन केले.

अंतिम सत्रात महादेव अबुल शास्त्रज्ञ जैन इरिगेशन यांनी कंपनीने शेतकऱ्यांना विविध पिकांचे पाणी व्यवस्थापन करताना ठिंबक व स्प्रिंकलर सिंचनाच्या वापराचे महत्त्व आणि सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून जमिनीची सुपीकता कशी टिकवावी याबद्दल पीपीटीद्वारे माहिती दिली.

कार्यक्रमाच्या समारोपवेळी आत्मा यांचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.टी.कर्नर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.

हेही वाचा - Farmer Success Story : मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतीला सेंद्रिय जोड देत आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशकथा

Web Title: Guidance training to farmers on water conservation and hi-tech agricultural technologies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.