Lokmat Agro >शेतशिवार > गुजरात, दिल्लीला टरबुजांना मिळतो जास्त भाव, निर्यातीवर शेतकऱ्यांचा भर !

गुजरात, दिल्लीला टरबुजांना मिळतो जास्त भाव, निर्यातीवर शेतकऱ्यांचा भर !

Gujarat, Delhi get higher prices for watermelons, farmers focus on export! | गुजरात, दिल्लीला टरबुजांना मिळतो जास्त भाव, निर्यातीवर शेतकऱ्यांचा भर !

गुजरात, दिल्लीला टरबुजांना मिळतो जास्त भाव, निर्यातीवर शेतकऱ्यांचा भर !

ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव, शेकडो टन टरबुजांची निर्यात

ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव, शेकडो टन टरबुजांची निर्यात

शेअर :

Join us
Join usNext

सिंचनाची सुविधा असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता टरबुजाची शेती करण्याकडे वळले आहेत. शेकडो हेक्टरवर टरबुजांची लागवड करण्यात आली असून, गुजरात व दिल्लीला त्यांची निर्यात करण्यात येत आहे. ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा भर गुजरात व दिल्लीकडे टरबूज पाठविण्यावर आहे.

विविध सिंचन प्रकल्प व विहिरींमध्ये पाणी असल्याने जिल्ह्यातील शिरला नेमाणे, अडगाव खुर्द, राहे, पिंपळखुटा, सावनी, पिंपळराव राजा, माटरगाव, वाडेगाव या भागात टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ ७० ते ७५ दिवसांचे पीक असल्याने शेतकरी एका वर्षात तीन पिके घेऊ शकतात. खरीप व रब्बी हंगामातील पिकांसह अनेक शेतकरी टरबुजाची लागवड करण्याकडे वळले आहेत. केवळ दोन ते अडीच महिन्यांत शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होतो. त्यामुळे अनेक शेतकरी टरबुजांची लागवड करतात.

उन्हाळ्यामध्ये टरबुजांना विशेष मागणी असते. जिल्ह्यात टरबुजांना ७ ते ८ रुपयांना मागणी आहे. तर गुजरात व दिल्लीमध्ये टरबूज पाठवले तर शेतकऱ्यांना १५ ते १६ रुपये प्रति टरबूज मिळत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात टरबुजांची मागणी असल्याने ट्रक भरून शेतकरी टरबुजांची निर्यात करत आहेत. दररोज ट्रकद्वारे टरबुजांची निर्यात करण्यात येत आहे.

मल्चिंग पेपरचेही दर वाढले

टरबुजाची शेती करण्याकरिता लागणाऱ्या मल्चिंग पेपरचे दर वाढले आहेत. मल्चिंग पेपर पूर्वी १२०० रुपयांना मिळत होता तर आता १७५० रुपयांना मिळत आहे. महागाई वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत टरबुजाच्या भावात वाढ झाली नाही. दरवर्षी खताच्या भावात वाढ होत आहे.

खताच्या भावात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

गत दोन ते तीन वर्षात वॉटर सोल्यूबल खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पूर्वी १९:१९ खत २२०० रुपयांना मिळत होते तर आता २९०० रुपयांना मिळत आहे. तसेच १३:४०:१३ खताचे दर पूर्वी २७०० रुपये होते. यामध्ये तब्बल ९०० रुपयांनी वाढ झाली असून, आता ३६०० रुपयांना मिळत आहे. ०:५२:३४ खत पूर्वी ३६०० रुपयांना मिळत होते तर यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका बॅगेचे दर १२०० रुपयांनी वाढले आहे. आता ४८०० रुपयांना हे खत मिळत आहे.

एकरी ७० हजार रुपये खर्च

■ टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच टरबुजाची लागवड करण्याकरिता लागणारे बियाणे, खत व विविध साहित्याचे दरही वाढले आहेत.

■ एका एकराकरिता जवळपास ७० हजार रूपये खर्च येतो. पीक कमी दिवसाचे असून, टरबुजाला मागणी असल्याने शेतकरी लागवड करण्यावर भर देत आहेत.

जिल्ह्यात तसेच आपल्या भागात टरबुजांची विक्री केली तर दर कमी मिळतो. मात्र गुजरात व दिल्लीला टरबुजांची निर्यात केल्यावर जास्त दर मिळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात टरबुजांची खरेदी करण्यात येते. शेतातून टरबूज गुजरातला पाठविण्यात येतात. शेतकऱ्यांना परवडत असल्याने अनेक शेतकरी निर्यात करण्यावर भर देत आहेत.

Web Title: Gujarat, Delhi get higher prices for watermelons, farmers focus on export!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.