Join us

कृषिरथाद्वारे कृषि विज्ञान केंद्राची ज्ञानगंगा पोहचणार गावोगावी; कृषक सप्ताह निमित्ताने कृवीकें सगरोळीचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:34 AM

कृविकें सगरोळी (जि. नांदेड) येथे कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्याकरिता भारतीय कृषि अनुसंधान परिषद दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहाचे उद्घाटन सोमवार (दि.२३) जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड भाऊसाहेब बर्हाटे व संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडले.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शेतकरी संवाद व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना बर्हाटे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र म्हणजे एक हक्काचे व्यासपीठ आहे. तर प्रमोद देशमुख यांनी शेतकरी व कृषि विज्ञान केंद्रांची व्याप्ती अधिकाधिक वाढावी यासाठी केंद्र शासनाने कृषि विज्ञान केंद्रांना अजून बळकटी देण्याची गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात कृषि रथ तयार करून त्याला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाच्या रथाचे उद्घाटन करण्यात आले. हा रथ कृषि समृद्धी व कृषि विज्ञान केंद्राची ज्ञानगंगा आठवडाभर गावोगावी पोहोचवत राहील. यामध्ये एक आठवडाभर वेगवेगळ्या गावात जाऊन कृषि विज्ञान केंद्राचे शस्त्रज्ञांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सगरोळी डॉ. माधुरी रेवनवार यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. प्रविण चव्हाण, आभार वेंकट शिंदे यांनी मानले. ड्रोन प्रात्यक्षिक डॉ. प्रियांका खोले यांच्या मार्गदर्शनाखाली दाखविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. कपिल इंगळे, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. निहाल मुल्ला, डॉ. कृष्णा अंभुरे, व्यंकट शिंदे व सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :शेती क्षेत्रनांदेडनांदेडस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड