हिंगोली :
शासनाचा दिशादर्शक प्रकल्प असलेल्या हळद संशोधन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, हळद उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून 'एआय तंत्रज्ञाना'च्या वापराविषयीही संशोधन केले जात आहे, अशी माहिती हळद संशोधन केंद्राचे (Research) अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री हेमंत पाटील यांनी दिली. (Use of 'AI')
बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राज्य शासनाने १०० कोटींचा निधी दिला असून ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून सध्या वसमत तालुक्यात हळद संशोधन केंद्राच्या इमारत उभारणीचे काम सुरू आहे. (Use of 'AI')
२२ एप्रिल रोजी हेमंत पाटील यांनी या इमारत बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर हळद संशोधन केंद्राच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. केंद्राच्या प्रक्षेत्रावर देशातील जास्त कुरकुमीन असणाऱ्या हळदीच्या नवनवीन प्रजातींची लागवड करण्यात येत आहे. (Use of 'AI')
टिश्यू कल्चरच्या माध्यमातून बेणे तयार करण्यात येऊन त्याची विक्री शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी इमारत बांधकामास सुरुवात झाली आहे. ३ वर्षांपासून हळद संशोधन केंद्राबाबत जनजगृती केली जात आहे.
शेतकऱ्यांना अधिकची माहिती व्हावी यासाठी शेतकरी मेळावे, कृषी कार्यशाळा, कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहेत. हळद पिकांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचा वापर हळद पिकाच्या उत्पन्नवाढीसाठी कसा करता येईल, याकरिता विविध कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. (Use of 'AI')
सध्या प्रचलित एआय तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा यामध्ये करता येईल का, याबाबत संशोधन (Research) सुरू आहे. भाभा अनुसंधान केंद्राचे (Bhabha Research Center) आय रेडिएशन केंद्र हा याच प्रकल्पाचा भाग आहे, असेही हेमंत पाटील यांनी सांगितले.
बांधकामाची केली पाहणी
* हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातून इमारत बांधकाम केले जात आहे. हेमंत पाटील यांनी मंगळवारी या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर संबंधितांना सूचना केल्या.
* इमारत बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून या ठिकाणी प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.