'प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रसंस्करण उद्योग योजने'च्या (Prime Minister Micro Food Processing Industries Scheme) माध्यमातून 'एक जिल्हा एक पीक' लागवड ही योजना हाती घेण्यात आली आहे. यामुळे एका विशिष्ट पिकावर कामकाज करून त्यावर प्रक्रिया केली जाते.
यातून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतात. यवतमाळ जिल्ह्यात या योजनेसाठी हळद (Halad) पिकाची (Crop) निवड करण्यात आली होती. आता तुरीसह इतरही पिकांची (Crop) निवड करण्यात आली आहे.
प्रक्रिया केलेली हळद आखाती देशांपर्यंत पोहोचली आहे. भारतीय हळद (Halad) प्रमुख्याने युरोपियन, युनियन, मध्य पूर्व, सार्क, आसियान, अमेरिका, युके, जपान आदी देशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ६ हजार हेक्टरवर हळदीची (Halad) लागवड करण्यात आली आहे. त्यात महागाव तालुका आघाडीवर आहे. यासोबतच उमरखेड, पुसद, दारव्हा तालुक्यांत ही लागवड करण्यात आली आहे. याशिवाय इतरही भागांत हळद लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत.
नवीन प्रयोगातून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे. यामुळे नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी मदत होत आहे. यातून नवीन शेतकरी आणि त्यांच्या शेतातील राबविण्यात आलेल्या पद्धतीदेखील माहिती पडणार आहेत.
१ जिल्हा १ पीक या उपक्रम
* जिल्ह्यात ६ हजार हेक्टरवर हळद लागवड करण्यात आली आहे.
* यवतमाळ जिल्ह्यात १ लाख १० हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योगांवर भर दिला जात आहे.
हळदीवरील प्रक्रिया उद्योग
या पिकासाठी शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो. जिल्ह्यात आतापर्यंत चार बचत गटांनी हळद प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्याही त्यासाठी पुढे आल्या आहेत. तर काही शेतकरी वैयक्तिक पातळीवर मार्केटिंग करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगांकडे वळावे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगांकडे वळावे, यासाठी ही योजना आहे. यात कृषी विभागाकडून त्यांना योग्य असे मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार ही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. यात अनेक शेतकरी पुढे येत आहेत, अशी माहिती कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी दिली. या प्रक्रिया उद्योगाकडे शेतकऱ्यांनी वळण्यासाठी पुढे यावे, असेही ते म्हणाले.
हळद पावडर, हळकुंड आणि पॅकिंग
प्रक्रिया करून हळद (Halad) पावडर तयार करणे, त्याचे पॅकिंग बनविणे, त्याला आकर्षक रंगसंगती दिली जात आहे. याशिवाय पॉलिश करून हळकुंडही शेतकरी विकत आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Market : हरभऱ्याला हमीभावाचे सरंक्षण केव्हा? वाचा सविस्तर