Harbhara Marke :
यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५ हजार ४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही. सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांजवळ नाही.
अशा परिस्थितीत आवक कमी झाली व सणासुदीच्या दिवसांत मागणी वाढली आहे. नवीन हरभरा बाजारात यायला वेळ आहे. त्यामुळे हरभऱ्याला १२ ऑगस्ट रोजी उच्चांकी ७ हजार २१२ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे.
जमिनीत आर्द्रता कमी असल्याने मागीलवर्षी हरभऱ्याचे सरासरी उत्पादन कमी झाले होते. यंदा हंगामापूर्वीच सोयाबीन हमीभावाच्या आत केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये क्विंटल असा जाहीर केला आहे.
दीड महिन्यात नवे सोयाबीन बाजारात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी खामगाव येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४ हजार १५० ते ४ हजार १५० रुपये भाव मिळाला आहे. यामध्ये उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे.
हरभऱ्याचे बाजारभाव (प्र/क्विं)
दिनांक बाजारभाव (प्र/क्विं)
१५ जुलै ५, ४७५ ते ६, २७०
१९ जुलै ५, ४०० ते ६, ४६५
२४ जुलै ५, ८७० ते ६, ५९०
३१ जुलै ५, ५०० ते ६, ५४५
५ ऑगस्ट ५, ९९० ते ६, ५३०
७ ऑगस्ट ५, ००० ते ६, ९०५
१२ ऑगस्ट ६, ३७० ते ७, ०००
हरभऱ्याची मागणी वाढली
सध्या सोयाबीनला बाजारात मागणी कमी असल्याने दरवाढ होण्याची शक्यता नाही. सणासुदीत हरभऱ्याची मागणी वाढत असल्याने थोडीफार दरवाढीची शक्यता आहे.
- अविनाश सोनटक्के, अडत व्यापारी, खामगाव.