रब्बी हंगामात हरभरा हे पीक (Crop) लाखमोलाचे मानले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबरला पेरणी केल्यानंतर आता हरभरा (chickpea) कापणीला वेग आला आहे. एकाच वेळी कापणीची (Harvesting) वेळ येत असल्याने आणि कापणीसाठी मजूरच मिळत नसल्याने कष्टकऱ्यांची पंचाईत होत आहे.
दुसरीकडे, हरभरा कापणीचे मजुरीचे दर दिवसाकाठी पाचशेच्या पार झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत मजुरीचे दर भडकल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) मशीनच्या माध्यमातून कापणी केली होती. यामध्ये थोडाफार फटका बसतो, असे काहींचे मत झाले. यामुळे यंदाच्या हंगामात अधिकांश शेतकरी मजुरांच्या माध्यमातून हरभरा कापणीचे काम करत आहेत. साधारणतः एका एकराला ८ ते १० मजूर लागतात.
उमरेड परिसरातील शेतशिवारात हरभरा कापणीसाठी वेग आला असून, राबणारे हात शेतात घाम गाळताना दिसत आहेत. उत्पादनापासून ते कापणी मळणीपर्यंत हरभऱ्यासाठीचा उत्पादन खर्च वाढतच चाललेला आहे.
दुसरीकडे, त्या तुलनेत दर मात्र मिळत नाही. यामुळे शेतकरी सतत चिंताग्रस्त दिसतो. मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलाचाही पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याचे संकेत आहेत.
रात्री थंडी आणि दिवसा उन्हाचा तडाखा या वातावरणामुळे हरभरा कापणीसाठी आला. येत्या काही दिवसांत कापणी झाली नाही तर घाटे पडण्याची भीतीही वर्तविली जात आहे. यामुळे एकाच वेळी बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा कापणीला आला आहे.
हजारो मजूरवर्ग दिमतीला
* उमरेड विभागात मजुरांची संख्या फारशी नाही. असे असले तरी नागपूर जिल्ह्याला खेटून असलेल्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर मजूरवर्ग या परिसरात येत असतो.
* सोयाबीन कापणी असो, हरभरा कापणी असो अथवा कापूस वेचणी, तिन्ही जिल्ह्यांतील हजारोंच्या संख्येने मजूरवर्ग उमरेड विभागात कष्टकऱ्यांच्या दिमतीला दिसून येतो.
कापणीला वेग आला, मजूर मिळेनासा झाला
मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मशीनच्या माध्यमातून कापणी केली होती. यामध्ये थोडाफार फटका बसतो, असे शेतकऱ्यांना वाटते. यामुळे यंदाच्या हंगामात अधिकांश शेतकरी मजुरांच्या माध्यमातून हरभरा कापणीचे काम करत आहेत. साधारणतः एका एकराला ८ ते १० मजूर लागतात.
कापसाचीही वेचणी
* एकीकडे हरभरा कापणीचे काम, तर दुसरीकडे अनेकांच्या शेतात कापूस वेचणीचेही काम सुरू आहे. या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर मजूरवर्ग लागतो.
* कापसाचा वेचा करण्यासाठीही शेतकरी कामाला लागले आहेत. यामुळे काम अधिक मजूर कमी, अशी परिस्थिती उदभवत मजुरीचे दरही गगनाला भिडले आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : 'सीसीआय'कडून कापूस खरेदीला येत आहेत 'या' अडचणी वाचा सविस्तर