उन्हाळा आला की आंब्याची चव केव्हा एकदा चाखतो असे होते. सामान्यपणे अक्षय्य तृतीयापासून आंब्याच्या आमरसाचा आस्वाद घेतला जातो; मात्र निसर्गाच्या आणि आंबा वृक्षतोडीमुळे, निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या काही वर्षांपासून गावरान आंबा दुर्मिळ होत चालला आहे. यंदा गावरानी आंब्याची चव चाखणे कठीण जरी असले तरी गावरान आंब्याचे भाव महागणार असल्याने जपूनच आंब्याची चव चाखावी लागणार आहे.
सध्या बाजारपेठेत वेगवेगळ्या संकरित वाणाचे आंबे येणे सुरू झाले असले तरी गावरान आंब्याची चव मात्र चाखणे लोक अधिक पसंत करतात. त्यामुळे गावरान आंब्याला बाजारपेठेत अधिक मागणी सुद्धा असते.
संकरित आंब्यांमुळे गावरान शेतशिवारात मोठ्या कष्टाने देखरेख करून आंब्याची झाडे मोठ्या जोखमीने वाढविलेली असतातः मात्र सरपणासाठी पाच दशकांपूर्वी असलेले आंब्याचे झाड आज मात्र दिसून येत नाही. तसेच वातावरणाचा सुद्धा लागवडीवर परिणाम झालेला दिसून येत असून यासाठी कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज होती; मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. लंगडा, दशहरी या आंब्याच्या प्रमुख जाती ग्रामीण भागात दिसून येत असतात. बदलत्या काळानुसार आंबे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर अधिक होत असल्याने आंब्याची चव बदलली आहे.
आंबे खरेदी करताना ग्राहक मागे पुढे करतात. मात्र नैसर्गिकरित्या झाडावरच पिकलेल्या आंब्याला बाजारपेठेत अधिक मागणी असते, मात्र पाडवा येईपर्यंत वाट पाहावी लागत असते. यासाठी आंबे विक्रेत्यांने रसायनाचा वापर करणे सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळते.
आंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतातील मोठमोठी आंब्याची झाडे तोडत आहेत. गावागावात असलेल्या आमराया नष्ट झाल्या आहेत. गावातील नागरिकही आता संकरित आंबे खरेदी करतात. गावरान आंब्यांची झाडे येत्या काही वर्षांमध्ये कायमची नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.- देवराव हुडेकर, वृक्षप्रेमी
गावरान आंब्याला बहर आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंबे झाडावर दिसून येत आहेत. असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. गावरान आंब्याची चव चाखायची असेल तर अजूनतरी एक ते सव्वा महिना वाट पाहावी लागणार आहे. मध्यंतरी झालेल्या वादळामुळेही गावरान आंब्यांचे नुकसान झाले होते.