Lokmat Agro >शेतशिवार > तुम्ही, ई- रेशनकार्ड काढले का ? घरबसल्या मोबाइलवरून करता येणार बदल !

तुम्ही, ई- रेशनकार्ड काढले का ? घरबसल्या मोबाइलवरून करता येणार बदल !

Have you drawn e-ration card? Changes can be made from mobile at home! | तुम्ही, ई- रेशनकार्ड काढले का ? घरबसल्या मोबाइलवरून करता येणार बदल !

तुम्ही, ई- रेशनकार्ड काढले का ? घरबसल्या मोबाइलवरून करता येणार बदल !

पत्ता बदलणे, रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे आदी कामे घरबसल्या करता येणे शक्य झाले आहे.

पत्ता बदलणे, रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे आदी कामे घरबसल्या करता येणे शक्य झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली असून आता ई- शिधापत्रिका मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातही ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, धान्याचा काळाबाजार होऊ नये, यासाठी शासन स्तरावरून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याअनुषंगाने आहेत. रेशनकार्ड काढण्यासाठीची होणारी गैरसोय पाहता शासनाने ऑनलाईन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंगोलीत एकूण दोन लाख रेशनकार्डधारक

जिल्ह्यात २ लाख ३९ हजार ४९८ रेशनकार्डची संख्या आहे. यात औंढा ना. ३३ हजार ७२७, वसमत ५७ हजार ७८२, हिंगोली ५३ हजार ३१५, कळमनुरी ५२ हजार २८, तर सेनगाव तालुक्यातील ४२ हजार ६४६ रेशनकार्डचा समावेश आहे.

रेशनकार्डात बदल करा ऑनलाइन

ऑनलाईन प्रणालीद्वारे नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करता येत आहे. तसेच पत्ता बदलणे, रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे आदी कामे घरबसल्या करता येणे शक्य झाले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व कार्ड ई रेशन प्रणालीवर आणण्यात येत आहेत.

रेशनकार्ड ऑनलाईन

ऑनलाईन रेशनकार्डबाबत शासनाने व्यवस्था केली आहे. सध्या रेशनकार्ड ऑनलाईन जोडणी केली जात असून अनेक कार्डची ऑनलाईन जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पारदर्शकता राखण्यास मदत होत आहे.

ई-रेशनकार्ड कोणाला मिळणार

ऑफलाईन ज्यांना रेशनकार्ड दिली जातात त्यांनाही ऑनलाईन रेशनकार्ड दिली जाणार आहेत. कार्यालयात न येता ऑनलाईन प्रस्ताव दाखल करता येतो.

पडताळणीनंतर मिळणार कार्ड

ज्यांना ऑनलाईन रेशनकार्ड काढावयाचे आहे त्यांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. हे प्रस्ताव पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी करून ई रेशनकार्ड जारी केली जाणार आहेत.

Web Title: Have you drawn e-ration card? Changes can be made from mobile at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.