आपण अनेक प्रकारच्या केळी खाल्ल्या असतील. त्यामध्ये गावरान केली, इलायची केळी, हायब्रीड केळी अशा केळींचा सामावेश आहे. तर सध्या बाजारात काळ्या रंगाची केळी, निळ्या रंगाची केळीच्या प्रजाती विकसीत झाल्या आहेत. तर निळ्या रंगाची केळी आपण कधी पाहिलीय का? तर जाणून घेऊया निळ्या रंगाच्या केळीबद्दलची माहिती...
निळ्या रंगाच्या केळीचा हा वाण इस्त्राईल या देशात मोठ्या प्रमाणावर आढळतो. या केळीमध्ये व्हॅनीला फ्लेवर आढळतो त्यामुळे या केळीचा वाण प्रसिद्ध आहे. तर निर्यातीसाठी या केळीला जास्त महत्त्व आहे. या केळीची सालही निळ्या रंगाची आणि आतील गरही निळ्या रंगाचा असतो त्यामुळे ही केळी आकर्षक दिसते.
लागवड
या केळीची लागवड ५ फूट बाय ६ फूट या अंतरावर केली जाते. तर या केळीचे उत्पादन ११ महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू होते. साधारण एकरी १२ ते १५ टनाच्या आसपास या केळीचे उत्पादन निघते. युरोपीयन देशात मागणी जास्त असल्याने दरही चांगला मिळतो. त्यामुळे निळ्या रंगाची ही केळी शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते.
उत्पादन
या केळीमध्ये व्हॅनिला फ्लेवर असल्यामुळे ही केळी प्रक्रिया उद्योगामध्ये वापरली जाते. त्यामुळे मागणी जास्त असते. तर प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांना दरही चांगलाच मिळतो. तर या केळीला आईस्क्रीमची केळी म्हणूनही ओळखले जाते.