Lokmat Agro >शेतशिवार > वन्यप्राण्यांचा शिवारांमध्ये हैदोस, धानाच्या रखवालीसाठी शेकोट्या अन् फटाके..

वन्यप्राण्यांचा शिवारांमध्ये हैदोस, धानाच्या रखवालीसाठी शेकोट्या अन् फटाके..

Haydos in shelters of wild animals, bonfires and crackers for guarding paddy.. | वन्यप्राण्यांचा शिवारांमध्ये हैदोस, धानाच्या रखवालीसाठी शेकोट्या अन् फटाके..

वन्यप्राण्यांचा शिवारांमध्ये हैदोस, धानाच्या रखवालीसाठी शेकोट्या अन् फटाके..

पीक वाचविण्यासाठी शेतकरी जागतात रात्र : पिकाच्या नासाडीने शेतकऱ्यांत असंतोष

पीक वाचविण्यासाठी शेतकरी जागतात रात्र : पिकाच्या नासाडीने शेतकऱ्यांत असंतोष

शेअर :

Join us
Join usNext

भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यप्राणी अभयारण्यालगतच्या गावातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढू लागला आहे. लोंबीवरील धानाचे पीक जमिनीवर लोळविले जात असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांत असंतोषाची भावना आहे. रात्रभर शेकोटी पेटवून तसेच विविध प्रकारचे आवाजाचे भोंगे वाजवावे लागत असल्याची परिस्थिती या भागात आहे. त्यातच वन्यजीवांच्या हल्ल्याची भीती वाढली आहे.

कोका अभयारण्यालगत असलेल्या सीतेपार, मांडवी, किटाळी, माटोरा, सालेहेटी, इंजेवाडा, सर्पेवाडा, दुधारा, चंद्रपूर, नवेगाव, कोका आदी गावांतील शेतकऱ्यांना मुख्य व्यवसाय धानाची शेती आहे. सध्या धान पीक परिपक्व • अवस्थेत असून काही ठिकाणी कापणी व मळणी सुरू आहे. तर भारी धान पीक शेतशिवारात उभे आहे. परंतु, धान पिकावर रानडुक्कर, हरिण, चितळ, रानम्हशी आदी वन्यप्राण्यांनी शिरकाव करून धानाची नासाडी चालविली आहे.

कोका अभयारण्याला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना धानाचे पन्हे टाकल्यापासून शेताकडे लक्ष देत राहावे लागते. मात्र, जंगली प्राण्यांच्या हैदोस थांबता थांबेना, अशी अवस्था आहे. रात्रीच्या सुमारास जंगली प्राणी शेतशिवारात जाऊन पिकांचा फडशा पाडत आहे.

सुगीच्या दिवसांत शेतकऱ्यांना रात्रभर शेकोटी वन्यप्राण्यांपासून पिकांचा थंडीपासून स्वतःचा बचाव लागत आहे. शेतशिवारात आवाज काढणारे भोंगे पेटवून वन्यप्राण्यांना घाबरविण्याचा प्रयत्न तर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे करावा रात्रीला शेतशिवारात विविध प्रकारचे विचित्र आवाज घुमताना दिसून येत आहेत. वाजवून काहींनी शेताला कुंपण केले, जिलेटिन लावली आवाज करणाऱ्या शिशा लावल्या आहेत. तर अनेकजण दिवाळीप्रमाणे फटाके फोडत आहेत... मात्र तरीही वन्यप्राण्यांचा धुमाकुळ कमी होताना दिसत नाही.

तर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

जंगलव्याप्त भागात आता शेती कसणे कठीण ठरत आहे. अनेक शेतकयांनी • आपली आपबीती सांगताना धानच होणार नाही, तर दिवाळीपूर्वी विकायचे काय, कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला. विविध बँक व सोसायट्यांचे घेतलेले कर्ज फेडावे की, कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा, असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

कोका अभयारण्याच्या जंगलव्याप्त भागात पीक घेणे आता जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे वन विभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी. - रजनीश बन्सोड, परिषद सदस्य, खमारी.

शेतकरी म्हणतात, जगावे तरी कसे?

खमारी येथील शेतकऱ्यांची शेती कोका अभयारण्याला लागून असलेल्या सीतेपार शिवारात आहे. वन्यप्राण्यांनी भाऊराव केजरकर, काशिनाथ पवनकर, चंद्रभान हरडे, केवल समरीत, गजानन केजरकर यांचे धानाचे पीक नेस्तनाबूत केले आहे. त्यामुळे हाती आलेले पीक वाया गेले असून जगावे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तसेच घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Web Title: Haydos in shelters of wild animals, bonfires and crackers for guarding paddy..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.