Lokmat Agro >शेतशिवार > कोजागरीला मसाला दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे

कोजागरीला मसाला दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Health Benefits of Drinking on Kojagiri pournima Milk | कोजागरीला मसाला दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे

कोजागरीला मसाला दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे

त्वचारोग रुग्णांनी या दिवशी मोकळ्या आकाशाखाली उघड्यावर चंद्राच्या शीतल प्रकाशात मसाला दूध करून प्यावे. त्यामुळे त्वचाविकार दूर होतात, असे सांगण्यात येते. दृष्टिदोष असलेल्या रुग्णांनीसुद्धा या दिवशी मसाला दूध तयार करून प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात.

त्वचारोग रुग्णांनी या दिवशी मोकळ्या आकाशाखाली उघड्यावर चंद्राच्या शीतल प्रकाशात मसाला दूध करून प्यावे. त्यामुळे त्वचाविकार दूर होतात, असे सांगण्यात येते. दृष्टिदोष असलेल्या रुग्णांनीसुद्धा या दिवशी मसाला दूध तयार करून प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात.

शेअर :

Join us
Join usNext

दरवर्षी तिथीनुसार आश्विन महिन्यात शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी साजरी केली जाते. कोजागरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा देशभरात अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. यादिवशी आवर्जून मसाला दूध केले जाते कोजागरी पौर्णिमेदिवशी रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात मसाला दूध तयार करण्यात येते. त्वचारोग रुग्णांनी या दिवशी मोकळ्या आकाशाखाली उघड्यावर चंद्राच्या शीतल प्रकाशात मसाला दूध करून प्यावे. त्यामुळे त्वचाविकार दूर होतात, असे सांगण्यात येते. दृष्टिदोष असलेल्या रुग्णांनीसुद्धा या दिवशी मसाला दूध तयार करून प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात. दुध खरेदी करताना शेतकऱ्यांकडून खरेदी करा म्हणजे त्याला अधिकचा नफा मिळेल.

आरोग्यासाठी फायदेशीर 
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने दूध प्यावंच असं काही नाही. दुधातील प्रोटीनमुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. शिवाय दुधात सुकामेवा वापरल्यामुळे ते जास्त परिणामकारक ठरतं. त्यामुळे तुम्ही कोजागरीच्या रात्री केसर, काजू आणि बदाम असा सुका मेवा वापरून मसाला तयार करु शकता. यामुळे हेल्थ ड्रिक तयार होतं, तर सुकामेवामध्ये चांगले फॅट्स असतात. मात्र, यावेळी भरपूर दूध नाही प्यायचं तर एक ग्लास दूध (२०० मिली) शरीरासाठी पुरेसं ठरू शकतं

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम
आता थंडी सुरु होत आहे, त्यामुळे आता शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ऊर्जा निर्माण करण गरजेचं आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसा दूध पिणं योग्य आहे. शरद पौर्णिमेचा दिवस हा 'फूल मून डे' म्हणजेच पौर्णिमेचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं द हे चंद्राच्या तत्त्वाने बनलेलं असतं. दूध हे पूर्णान्नि आहे. त्यामुळे दुधाचे सेवन करणं योग्यच आहे.

वैज्ञानिक कारण
मसाला दूध तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूध आणि सुका मेवा वापरण्यात येतो. दुधात मोठ्या प्रमाणात लॅक्टिक अॅसिड आढळते. सुका मेवासुद्धा आरोग्यदायी असतो. कोजागरी पौर्णिमेला चंद्राचा शीतल प्रकाश अधिक तीव्र असतो. या प्रकाशात मसाला दूध तयार करून प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Web Title: Health Benefits of Drinking on Kojagiri pournima Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.