Lokmat Agro >शेतशिवार > गुणकारी करवंदाचे आरोग्यदायी फायदे व करवंदापासून निर्मित होणारे प्रक्रियायुक्त पदार्थ

गुणकारी करवंदाचे आरोग्यदायी फायदे व करवंदापासून निर्मित होणारे प्रक्रियायुक्त पदार्थ

Health benefits of Gunkari Karvanda and processed products made from Conkerberry | गुणकारी करवंदाचे आरोग्यदायी फायदे व करवंदापासून निर्मित होणारे प्रक्रियायुक्त पदार्थ

गुणकारी करवंदाचे आरोग्यदायी फायदे व करवंदापासून निर्मित होणारे प्रक्रियायुक्त पदार्थ

करवंदात व्हिटामीन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के ...

करवंदात व्हिटामीन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के ...

शेअर :

Join us
Join usNext

करवंद या फळाला आपल्याकडे रानमेवा असेही म्हटले जाते. करवंद हे भारतातील देशी झुडूप आहे.

डोंगरची काळी मैना म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. करवंदे ही चवीला आंबट-गोड असून काळ्या रंगाची फळे असतात.

तसेच करवंदाच हे फ़ळ विविध गुणकारी गुणांनी अतिशय समृद्ध आहे बरं का. ह्यात व्हिटामीन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह, खनीज , कॅल्शियमची, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ़ायबर्स आणि एंथोसायनिन म्हणजेच तंतुमय घटक पदार्थ भरपूर असतात. यासोबतच यातली प्रथिनं आणि आम्ल शरीराला उर्जा नी तरतरी मिळवून देते.

आपण हल्ली ॲंटिबायोटिकवर फ़ार अवलंबून रहातो. पण आदीवासी समाजात आजही शरीरातील साखरेचं प्रमाण स्थीर ठेवण्यासाठी करवंदाचाच वापर केला जातो. पारंपारिकपणे वनस्पती उपचारात देखील करवंद वापरले गेले आहे. ज्यात खरुज, आतड्यांतील जंत, अतिसार, अधूनमधून येणारा ताप आणि कामोत्तेजक, अँटीपायरेटिक, एपेटाइजर, अँटीस्कॉर्ब्युटिक, अँथेलमिंटिक आणि सोबत करवंद (Conkerberry) त्याच्या तुरट गुणधर्मांसाठी देखील विशेष प्रसिद्ध आहे.

करवंदे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

  • करवंदे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
  • करवंदे त्वचेला निरोगी ठेवतात.
  • करवंदे डोळ्यांना निरोगी बनवतात.
  • करवंदे वजन आटोक्यात आणतात.
  • करवंदे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते.
  • करवंद रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
  • करवंदे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
  • करवंदे कॅन्सरला रोखतात.
  • करवंदे हाडांसाठी उपयुक्त असतात.
  • करवंदापासून उष्णतेचे विकार कमी होतात


करवंदापासून तयार केलेले प्रकीर्यायुक्त पदार्थ 

करवंद जाम

कच्ची करवंदे देठ काढून तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर १:१.५ या प्रमाणात करवंद आणि पाणी घेऊन करवंदे (Karanda) चांगली शिजवावीत. शिजलेली करवंदे हाताने कुस्करून ती एक मि.मी.च्या स्टेनलेस स्टील चाळणीतून त्याचा गर वेगळा करावा.

नंतर एक किलो गरामध्ये एक किलो साखर आणि दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मिश्रण पेजेप्रमाणे घट्ट होईपर्यंत उकळावे. जॅममध्ये २५० मिलिग्रॅम पोटॅशिअम मेटाबायस्फाईट प्रति किलो जॅम या प्रमाणात मिसळून जॅम गरम असतानाच रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावा. बाटल्या बंद करून थंड आणि कोरड्या जागी ठेवाव्यात. 

करवंद लोणचे

कच्ची करवंदे देढ काढून कोमट पाण्यात सोडा घालून भिजवून ठेवावीत. थोड्या वेळानी दोनदा चोळून धुवावीत म्हणजे चीक जातो. करवंदे पुसून घ्यावीत. हळद, मीठ, लोणच्याचा मसाला घालून मिसळावे. तीन चमचे तेलाची मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. गार फोडणी लोणच्यावर घालावी. चवीला साखर घालावी. लोणचे लवकर संपवावे. दीर्घ काळ टिकत नाही. 

करवंद चटणी

कच्ची करवंदे देठ काढून स्वच्छ धुऊन घ्यावीत. करवंद 1:1.5 प्रमाणात पाणी घालून फुटेपर्यंत शिजवावीत आणि चाळणीच्या साह्याने त्याचा गर काढून घ्यावा. सर्वप्रथम करवंदाच्या गरात साखर आणि मीठ मिसळून मिश्रण उकळत ठेवावे. त्यानंतर वेलची,

दालचिनी, मिरची पूड, आले, कांदा आणि लसूण मलमलच्या कापडात बांधून ती पुरचुंडी उकळत ठेवलेल्या मिश्रणात सोडावी व मिश्रण ढवळत राहावे. मिश्रण जॅमप्रमाणे घट्ट झाल्यावर मसाल्याची पुरचुंडी पिळून घ्यावी. नंतर मिश्रणात व्हिनेगार टाकून ते थोडा वेळ उकळू द्यावे.

चटणी अधिक काळ टिकण्यासाठी २५० मिलिग्रॅम सोडिअम बेंझोएट प्रति किलो चटणीत मिसळावे. चटणी गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बाटलीत भरावी व बाटल्यांना झाकण लावून त्या थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.

करवंद रस

मानवी वापरासाठी रस तयार करणे आणि बाटली मध्ये जतन करणे शक्य आहे. हे रस इतर फळांसोबत मिश्रण करून घेऊ शकतो किंवा थंड पेय म्हणून.

सुका करवंद

करवंद सुका मेवा तयार करण्यासाठी वाळवला जाऊ शकतो जो स्टोरेजमध्ये चांगला ठेवतो. सुका करवंद तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता किंवा ते अन्नधान्य, ट्रेल मिक्स किंवा बेक केलेल्या उत्पादनांमध्ये मिसळा.

करवंद सिरप

पिकलेल्या करवंदांपासून सिरप तयार करण्यासाठी सर्वप्रथम पूर्ण पिकलेली, ताजी, रसरशीत करवंदे निवडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर करवंदे न शिजवता चाळणीवरून घासून त्यापासून रस काढावा. नंतर एक किलो रसामध्ये दोन किलो साखर टाकून एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाणे ६८.५ टक्के करावे. त्याचप्रमाणे सिरपमध्ये सायट्रिक आम्ल टाकून सिरपची आम्लता १.५ टक्का ठेवावी. निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत सिरप भरून बाटल्या थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.

लेखक 
डॉ. सोनल रा. झंवर
सहाय्यक प्राध्यापक एम . जी . एम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर
डॉ. मस्के सचिन वि.
सहाय्यक प्राध्यापक एम . जी . एम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर

हेही वाचा - प्रोबायोटिक्स देईल साथ; रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजरांवर करा मात

Web Title: Health benefits of Gunkari Karvanda and processed products made from Conkerberry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.