पळसाच्या पानांचा पारंपरिक आणि वैद्यकीय दोन्ही प्रकारे विविध उपयोग होतो. पळसाच्या पानांचा उपयोग प्राचीन काळापासून पत्रावळी आणि द्रोण बनवण्यासाठी केला जात आहे. यावर गरमागरम अन्न वाढल्याने त्या अन्नाबरोबर पळसाचे औषधी गुणधर्म शरीरात जातात. हे औषधी गुणधर्म अन्नाचे पचन सुधारतात आणि आरोग्याला फायदेशीर ठरतात.
औषधी गुणधर्म
पचन सुधारणा : पळसाच्या पानांमध्ये फायबर असते, जे पचनक्रियेला सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
हृदय स्वास्थ्य : पळसाचा अर्क हृदयाच्या विकारांवर गुणकारी असतो. हृदयाचे ठोके अनियमित होणे, उच्च रक्तदाब आणि कोरोनरी हृदयरोग यावर पळसाचा अर्क उपयुक्त असतो.
त्वचा संक्रमण : पळसाच्या पानांची पेस्ट त्वचेवर लावल्यास त्वचेचे संक्रमण आणि जखमा बऱ्या होतात.
रोगप्रतिकारक शक्ती : पळसामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
मधुमेह : पळसाच्या इथेनॉल अर्कामध्ये अँटीहायपरग्लाइसेमिक गुणधर्म आहेत, जे मधुमेहाचे नियमन करण्यास मदत करतात.
अँटीऑक्सिडंट्स : पळसाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीरातील मुक्त कणांशी लढा देण्यास मदत होते. हे मुक्त कण शरीरातील पेशींना हानी पोहोचवतात, त्यामुळे अँटीऑक्सिडंट्स त्यांना नियंत्रित ठेवतात.
अन्य उपयोग
भाकरी बनवणे : मध्य प्रदेशातील काही आदिवासी समाज पळसाच्या पानांचा उपयोग पाणीया नावाच्या विशेष भाकरी तयार करण्यासाठी करतात. पानांवर पोळी लाटून, ती पानांच्या धुरावर भाजली जाते, ज्यामुळे भाकरीला विशेष चव प्राप्त होते
औषध म्हणून : पळसाच्या पानांचा उपयोग पडसे, खोकला, आणि किडनी विकारांवर औषध म्हणून केला जातो. पळसाचे सौम्य काढा पडसे आणि खोकला यावर गुणकारी असतो.
पानांचा उपयोग : बंगालमध्ये पळसाची पाने बिडी बांधण्यासाठी वापरतात.
पळसाच्या पानांचा उपयोग करणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असू शकते. यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे पाचन, हृदय, त्वचा, आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात.
लेखक
डॉ. सोनलरा. झंवर
साहाय्यक प्राध्यापक
एम . जी . एम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर
हेही वाचा - गुणकारी आरोग्यदायी लिची फळाचे पोषण मूल्य आणि आरोग्यास होणारे लाभ