भारतात ऊस उत्पादनाचे क्षेत्र मोठे आहे. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर अशा जिल्ह्यांना ऊसाचे माहेरघर मानले जाते. उसाच्या गाळपातून दरवर्षी साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन होत असते. तरीही आपल्याकडे उसाच्या रसाचे आरोग्यदृष्ट्या असणारे फायदे अनेकांना माहीत नाहीत हे आश्चर्यकारक आहे.
वास्तविक उसाचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. गोड चवीसोबतच उसाच्या रसात कॅल्शिअम, क्रोमियम, कोबाल्ट, कॉपर, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि झिंक या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे. याशिवाय उसाच्या रसात विटॅमिन ए, बी१, बी२, बी३, बी५, बी६, आणि सी तसेच अँटीऑक्सीडंट्स, प्रोटीन आणि पाचनासाठी आवश्यक फायबर्स देखील आहेत.
उर्जादायी
उन्हाळ्यात शरीराची उर्जा कमी होऊ लागते, आणि अशा वेळी उसाचा रस शरीराला उर्जा देतो. उसाच्या रसात असलेल्या ग्लुकोजमुळे शरीर हायड्रेट राहते आणि उर्जेची पातळी वाढते. ज्यामुळेच कोणत्याही पॅक केलेल्या ज्यूसच्या ऐवजी रोज एक ग्लास ताज्या उसाचा रस पिणे अधिक फायदेशीर ठरते.
मधुमेहाला नियंत्रणात ठेवतो
उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जरी जास्त असले तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा रस फायदेशीर ठरतो. त्यातील नैसर्गिक शुगर आणि ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करतात. विशेषतः टाईप-२ मधुमेहाच्या रुग्णांनी हा रस सेवन करणे चांगले असते.
कर्करोगापासून संरक्षण
उसाच्या रसातील कॅल्शिअम, मॅग्नेशियम, पोटॅशिअम, आयर्न आणि मँगनीज शरीरात अल्कलाइन वातावरण तयार करतात. ज्यामुळे कर्करोगाची संभावना कमी होते. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की उसाचा रस पिण्यामुळे शरीरात कर्करोगजन्य कोशिका वाढू शकत नाहीत आणि महिलांमध्ये ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका देखील कमी होतो.
मुत्रपिंडाचे संरक्षण
मुत्रपिंडाच्या आरोग्यासाठी प्रथिनांची पातळी संतुलित ठेवणे आवश्यक आहे. यामुळे उसाचा रस मुत्रपिंडाचे स्वास्थ्य सुधारतो. खास करून उन्हाळ्यात महिलांना होणारे युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI), एसटीडी आणि जळजळ यावर हा रस फायदेशीर ठरतो.
अँटीऑक्सीडंट्सचा स्रोत
उसाच्या रसात अँटीऑक्सीडंट्सचा मोठा समावेश असतो जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतात. यकृताच्या आरोग्यासाठी पित्ताच्या पातळीला नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हा रस उपयुक्त आहे. काविळीच्या रुग्णांना सुद्धा डॉक्टर उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात.
पचनक्रिया सुधारते
उसाच्या रसात असलेला पोटॅशिअम पचनक्रियेला सुरळीत ठेवतो. पोटाचा कॅन्सर, गॅस, अपचन, जळजळ आणि इतर पचनविकारांवर देखील त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो.
दातांसाठी फायदेशीर
हिरड्यांचे दुखणे, तोंडाची दुर्गंधी आणि दातांचे इतर दुखणे दूर करण्यासाठी उसाचा रस खूप फायदेशीर ठरतो. यामुळे दातांची चमक कायम राहते आणि दातांचे आरोग्य सुधारते.
त्वचेसाठी फायदेशीर
तजेलदार त्वचेसाठी अल्फा हायड्रोक्साईड अॅसिड फार उपयुक्त आहे. हे अॅसिड पुरळ आणि खिळ हटवण्यास मदत करते, तसेच त्वचेला हायड्रेट ठेवते. चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे होणारे अकाली म्हातारपण कमी होते. उसाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते. याशिवाय, त्याचा वापर मास्क आणि स्क्रब म्हणूनही केला जाऊ शकतो.
नखांना मजबुती
कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे नखे कमकुवत होतात आणि त्यावर पांढरे डाग पडतात. अशा स्थितीत उसाचा रस पिणे नखांना मजबुती देऊन त्यांचे शुभ्रपण कायम राखतो.
हेही वाचा : Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स