Join us

Health Benefits of Tamarind : अबब केवळ एका चिंचेचे किती 'हे' आरोग्यदायी फायदे  

By रविंद्र जाधव | Published: November 13, 2024 1:48 PM

चिंच (Tamarind) हे एक अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले आरोग्यदायी फळ (Healthy Fruit) आहे. ज्याचा उपयोग प्राचीन आयुर्वेदापासून केला जातो. तर ब्रह्मसंहिता या ग्रंथात देखील चिंचेच्या औषधी (Medicine) गुणांची वर्णनं केली गेली आहेत. चिंच आपल्या आंबट चवीमुळे तोंडाला चव (Test) आणते. तसेच विविध औषधी उपयोगामुळे चिंच आपले आरोग्य सुधारण्यास मदत करते.

चिंच (Tamarind) हे एक अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले आरोग्यदायी फळ आहे. ज्याचा उपयोग प्राचीन आयुर्वेदापासून केला जातो. तर ब्रह्मसंहिता या ग्रंथात देखील चिंचेच्या औषधी गुणांची वर्णनं केली गेली आहेत. चिंच आपल्या आंबट चवीमुळे तोंडाला चव आणते. तसेच विविध औषधी उपयोगामुळे चिंच आपले आरोग्य सुधारण्यास मदत करते.

यासोबतच चिंच फळ, झाडाची साल आणि पाला हे सर्व औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. विशेषतः शाकाहारी व्यक्तींना लोहाचे पचन कठीण जाते. अशावेळी मात्र चिंच, आवळा आणि कोकम या आंबट पदार्थांचा सेवन केल्याने लोहाचे पचन सुलभ होते. यामुळे आयर्नच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या व्यक्तींना चिंच हा एक उत्तम पर्याय ठरतो. 

चिंचेचे औषधी गुणधर्म 

भूक वाढविण्याचे कार्य - चिंच भूक कमी झालेल्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ती भूक वाढविण्यास मदत करते, त्यामुळे आहाराची आवड आणि पचन सुधारते.

श्रम व ग्लानी नष्ट करणे - चिंच श्रमामुळे किंवा शरीरातील थकवा, भ्रम, आणि ग्लानी दूर करण्यास मदत करते. ती शरीराला ऊर्जा देऊन मनुष्याला ताजेतवाने करते.

पित्तशामक गुणधर्म - चिंचेचे सरबत पित्त शांत करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. पित्ताच्या वाढीमुळे शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे व्यक्तीला अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत चिंचेचे सरबत किंवा पन्हे उपयोगी ठरतात. उष्माघाताने त्रस्त असलेल्या व्यक्तींना ही चिंचेची चांगली उपचार पद्धती आहे.

खनिजांचा समृद्ध स्त्रोत - चिंचेच्या कोवळ्या पानांमध्ये लोह, फॉस्फरस, क्लोरिन, तांबे आणि गंधक सारखी महत्त्वाची खनिजे असतात. हे खनिज शरीराच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. कोवळ्या पाल्यांचा उपयोग कच्च्या स्वरूपात खाल्ला जाऊ शकतो किंवा त्यापासून भाजीही तयार केली जाऊ शकते.

सूज कमी करणे - चिंचेच्या पानांचा उपयोग सूज कमी करण्यासाठी केला जातो. शरीराच्या विविध भागांमध्ये सूज येणाऱ्यांसाठी चिंच अत्यंत उपयुक्त आहे.

वात व पित्तशामक गुण - चिंच हे वात आणि पित्तशामक आहे, म्हणजेच ती शरीरातील वात आणि पित्त यांचं संतुलन राखण्यात मदत करते. यामुळे शरीरातील विविध विकार कमी होतात.

हृदयाची ताकद वाढवणे - चिंच हृदयाच्या स्नायूंना ताकद देण्याचं कार्य करते. हृदयाची ताकद कमी झालेल्या व्यक्तींना चिंचेपासून तयार केलेले सरबत अत्यंत उपयुक्त ठरते. हे सरबत हृदयाच्या कार्यप्रणालीस सुधारतं आणि हृदयाच्या स्नायूंना आवश्यक पोषण पुरवते.

हेही वाचा : Health Benefits Of Amaranth : अमरंथच्या पर्णांचे पोषणतत्त्व आणि आरोग्यदायी फायदे

टॅग्स :आरोग्यशेती क्षेत्रफळेभाज्याहेल्थ टिप्स