Join us

Health Benefits Of Terminalia Arjuna : अर्जुन वृक्षाचे 'हे' एवढे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 4:49 PM

आयुर्वेदात अर्जुनाच्या झाडाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. नदीच्या किनारी आणि ओढे झरे यांच्या कडेला अर्जुनाची झाडे अधिक प्रमाणात दिसून येतात. अर्जुनाच्या झाडाची साल अत्यंत औषधी समजली जाते. या सालीमध्ये कॅल्शियम सॉल्ट, मॅग्नेशियम सॉल्ट आणि ग्लुकोसाईड यांचे अस्तित्व आढळून येते.

आयुर्वेदात अर्जुनाच्या झाडाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. या झाडाला, कोहा, काहू, अर्जन, ओर्जुन, येरामड्डी अशी अनेक नावे आहेत. नदीच्या किनारी आणि ओढे झरे यांच्या कडेला अर्जुनाची झाडे अधिक प्रमाणात दिसून येतात. अर्जुनाच्या झाडाची साल अत्यंत औषधी समजली जाते. या सालीमध्ये कॅल्शियम सॉल्ट, मॅग्नेशियम सॉल्ट आणि ग्लुकोसाईड यांचे अस्तित्व आढळून येते.

अर्जुनाच्या सालीचा वापर अनेक औषधी कामांकरिता केला जातो. या झाडांच्या पानांचा रस अनेक व्याधी आणि आजारांवर प्रभावी उपचार समजला जातो. हगवण आणि कान दुखणे यासारख्या आजारांमध्ये अर्जुनांच्या पानांचा रस अत्यंत उपयुक्त ठरतो. अर्जुनाच्या झाडात अनेक अॅण्टी ऑक्सिडंटस् आढळून येतात.

त्यामुळे हृदयाच्या तक्रारीवर या झाडांच्या पानांचा रस, औषध म्हणून वापरला जातो. शरीरातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी करण्याचे काम अर्जुनाच्या पानांच्या रसामुळे होते. हृदयाचे स्नायू मजबूत करण्याचे काम या झाडांच्या पानामुळे होते. त्यामुळेच आयुर्वेदात अर्जुनाच्या झाडापासून बनवलेली औषधे हृदयविकाराच्या रुग्णांकरिता वापरली जातात. 

हृदयाचे कार्य कोणत्याही अडथळ्याविना चालावे याकरिता अर्जुनाच्या पानांचा रस उपयुक्त ठरतो. अर्जुनाच्या झाडाच्या सालीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. अस्थम्यासारख्या आजारामध्ये या झाडाच्या सालीचा औषध म्हणून वापर केला जातो. या झाडाचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊनच धार्मिक परंपरेत या झाडाला महत्त्वाचे स्थान दिले गेले असावे. या झाडाविषयी अनेक पौराणीक आख्यायिका सांगितल्या जातात.

या झाडाची पाने आणि फुले भगवान विष्णू आणि श्री गणेश यांना अर्पण केली जातात. प्राचीन काळापासून अर्जुनाची पाने, फुले, साल यांचा वापर औषधांमध्ये केला जातो आहे.

हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म

टॅग्स :शेती क्षेत्रहेल्थ टिप्सआरोग्य