Join us

Healthy Jaggery Water : आरोग्याच्या विविध समस्यांना रामबाण उपाय; गुळाचे पाणी देई हमखास आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:21 IST

Healthy Jaggery Water : गुळाचे पाणी हे भारतीय घराघरात अत्यंत लोकप्रिय आणि आरोग्यदायक पेय म्हणून ओळखले जाते. विशेषतः उन्हाळ्यात गुळाचे पाणी एक ताजेतवाने थंड म्हणून देखील विविध लोकांना आवडते.

गुळाचे पाणी हे भारतीय घराघरात अत्यंत लोकप्रिय आणि आरोग्यदायक पेय म्हणून ओळखले जाते. विशेषतः उन्हाळ्यात गुळाचे पाणी एक ताजेतवाने थंड म्हणून देखील विविध लोकांना आवडते.

गुळाचे पाणी पिणे केवळ ताजेपणाचा अनुभव देत नाही तर ते शरीरासाठी विविध फायदे देखील देतं. गुळाचे पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.

पचनसंस्थेसाठी चांगले

गुळाचे पाणी पचनसंस्थेसाठी खूप चांगले आहे. यामध्ये असलेले फायबर्स पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. गॅस्ट्रिक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी, अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी गुळाचे पाणी फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील पचनशक्ती सुधारते आणि हळूहळू शरीराची समतोल पद्धतीने कार्यप्रणाली चालते.

त्वचेसाठी फायदेशीर

गुळाचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स असतात, जे त्वचेला उजळवतात आणि सौंदर्य वाढवतात. गुळाच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे त्वचेतील दूषित पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. नियमित गुळाचे पाणी पिण्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधरते आणि विविध त्वचेचे आजार कमी होऊ शकतात.

हृदयाचे आरोग्य

गुळात असलेले मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. गुळाचे पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. तसेच, हृदयाच्या कार्यप्रणालीवर सकारात्मक प्रभाव पडतो. हृदयविकाराच्या धोका कमी करण्यासाठी गुळाचे पाणी उपयुक्त ठरू शकते.

वजन नियंत्रण

गुळाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करू शकते. ते कमी कॅलोरी असले तरी शरीराला आवश्यक पोषण मिळवते. गुळाच्या नैसर्गिक गुणांमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. वजन नियंत्रण ठेवण्यास गुळाचे पाणी एक उपयुक्त पर्याय आहे.

प्राकृतिक ऊर्जा

गुळाचे पाणी शरीरातील ऊर्जा वाढवते. गुळात असलेली नैसर्गिक शक्कर शरीरात त्वरीत ऊर्जा पोहोचवते. त्यामुळे, शारीरिक थकवा कमी होतो आणि ताजेतवानेपणाचा अनुभव मिळतो. जिम किंवा व्यायाम करत असताना गुळाचे पाणी ऊर्जा स्रोत म्हणून वापरता येते.

कॅलोरीज

गुळाचे पाणी साधारणतः १०० मिली लिटरमध्ये ७०-८० कॅलोरीज असतात. यामध्ये विविध पोषणतत्त्वांचा समावेश असतो, जसे की आयर्न, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियम. गुळाचे नैसर्गिक गुणधर्म हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, जे शरीराच्या समतोल आणि ताजेपणाला मदत करतात.

डॉ. सोनल रा. झंवरसहाय्यक प्राध्यापकएम. जी. एम अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर.

हेही वाचा : आवळ्याचे मूल्यवर्धन करून उभारा उद्योग; वाचा आवळ्याच्या विविध १५ उत्पादनाची सविस्तर माहिती

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सऊसशेती क्षेत्रशेतकरी