Lokmat Agro >शेतशिवार > Healthy Lemon-Citrus Fruit : विविध आजारपणात गुणकारी असलेल्या पपईएवढ्या गळलिंबूची वाचा आरोग्यदायी माहिती

Healthy Lemon-Citrus Fruit : विविध आजारपणात गुणकारी असलेल्या पपईएवढ्या गळलिंबूची वाचा आरोग्यदायी माहिती

Healthy Lemon-Citrus Fruit : Read in detail health benefits of lemon which look like a papaya in various diseases | Healthy Lemon-Citrus Fruit : विविध आजारपणात गुणकारी असलेल्या पपईएवढ्या गळलिंबूची वाचा आरोग्यदायी माहिती

Healthy Lemon-Citrus Fruit : विविध आजारपणात गुणकारी असलेल्या पपईएवढ्या गळलिंबूची वाचा आरोग्यदायी माहिती

आयुर्वेदात गळलिंबाला महत्त्व असून, या लिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. किडनी स्टोन असणारे अनेकजण गळलिंबाचे सेवन करतात.

आयुर्वेदात गळलिंबाला महत्त्व असून, या लिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. किडनी स्टोन असणारे अनेकजण गळलिंबाचे सेवन करतात.

शेअर :

Join us
Join usNext

आयुर्वेदात गळलिंबाला महत्त्व असून, या लिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. किडनी स्टोन असणारे अनेकजण गळलिंबाचे सेवन करतात. तसेच पचनसंस्थेचे विकार, कॉलेस्ट्रॉल व रक्त शुद्धीकरणाचे कामही गळलिंबू करत असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ज्या दिवसात गळलिंबू येते. त्यावेळेस ते खायलाच पाहिजे.

हिंगोली शहरातील भाजी मंडईत काही वेळा गळलिंबू विक्रीसाठी आल्याचे पहावयास मिळते. तर काही वेळा शहरातील इंदिरा गांधी चौकातही शेतकरी गळलिंबू विक्री करतात. या ठिकाणी शंभर रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत एक गळलिंबू मिळते.

गळलिंबूतील औषधी गुण

पचनसंस्थेचे विकार : गळलिंबू खाल्ल्याने पचनसंस्थेचे विकार दूर होऊन पचनसंस्था सुधारते. पोटाचे इतर विकारही या लिंबामुळे कमी होतात.

रक्त शुद्धीकरण : गळलिंबूत औषधी गुणधर्म असल्याने रक्त शुद्धीकरण करण्यासाठीही गळलिंबू खाणे फायदेशिर ठरते.

किडनी स्टोनवर गुणकारी : ज्यांना किडनीस्टोनचा त्रास आहे. त्यांनी गळलिंबाचे सेवन करणे गुणकारी ठरते. मूत्र नळीत साठलेले क्षारही दूर होतात.

पपईसारखा आकार; किलोभर वजन

नव्या पिढीतील अनेकांनी 'गळलिंबू' हा शब्दही ऐकलेला नसेल. परंतु, नावाप्रमाणेच दुर्मिळ असलेल्या गळलिंबाला आयुर्वेदात मोठे महत्व असून, त्यात औषधी गुणधर्म आहे. त्याचा आकार पपईसारखा असतो.

इडलिंबू व गळलिंबात फरक काय?

गळलिंबू म्हणजे एक प्रकारचा लिंबूच असतो. यात भरपूर प्रमाणात 'सी' जीवनसत्त्व असते. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. गळलिंबाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर इडलिंबूचा वापर मुरंबामध्ये केला जातो. या फळांच्या सालीतून तेल काढले जाते आणि ते बेकरी, शीतपेये आणि कॅडिजमध्ये चव यावी म्हणून वापरले जाते.

१०० ते २०० रुपयांदरम्यान विक्री

हिंगोली शहरातील भाजी मंडई तसेच इंदिरा गांधी चौकात काही वेळा गळलिंबू विक्री आलेले पहावयास मिळते. १०० ते २०० रुपयाला एक लिंबू विक्री होते. हे फळ दुर्मिळ असल्याने बाराही महिने उपलब्ध होत नाही.

हेही वाचा - Rainy Season Fruit Health Benefits पावसाळ्यात किवी, ड्रॅगन फ्रूट का खावे?

Web Title: Healthy Lemon-Citrus Fruit : Read in detail health benefits of lemon which look like a papaya in various diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.