मिठामध्ये सोडियम असते जे शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असते. अत्यावश्यक कार्यासाठी पुरेसे सोडियम मिळणे आणि आरोग्यास धोका होऊ नये म्हणून अतिसेवन टाळणे महत्त्वाचे असते.
त्यामुळे मिठाचा वापर संतुलित ठेवणे गरजेचे आहे. मिठाचे अनेक प्रकार आहेत. जसे की, टेबल मीठ, सेंधे मीठ, काळे मीठ, समुद्री मीठ, हिमालयीन गुलाबी मीठ इत्यादी.
१. मीठ का गरजेचे आहे?
मिठाचा मुख्य घटक सोडियम आहे. सोडियम पाण्याचे वितरण नियंत्रित करते आणि निर्जलीकरण प्रतिबंधित करते. नसा आणि स्नायूंसाठी सोडियम आवश्यक आहे. हे रक्तदाब नियंत्रित करते आणि आम्ल आणि अल्कधर्मी संतुलन राखण्यास मदत करते.
२. मिठाचे सेवन किती प्रमाणात असावे?
दुर्दैवाने बहुतेक लोक शिफारस केलेल्या सेवनापेक्षा २ ते ३ पट जास्त मीठ वापरतात. जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन दररोज २३०० मिलिग्रामपेक्षा कमी मीठ वापरण्याची शिफारस करतात. एक चमचा मीठ योग्य आहे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, दररोज १५०० मिलिग्राम मीठ वापरण्याची शिफारस केली जाते.
३. जास्त मिठाच्या सेवनाचे आरोग्यास धोके काय?
• जास्त प्रमाणात सोडियम पाणी टिकवून ठेवते आणि रक्तदाब वाढवते. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीच्या नुकसानासाठी जोखीम वाढविते. दररोज १ ग्रॅम मीठ कमी केल्याने रक्तदाब ५ एमएमने कमी होतो.
• कमी सोडियम असलेला आहार स्ट्रोकची जोखीम २३ टक्के कमी करतो. अधिक सोडियमच्या सेवनाने किडनी स्टोन व किडनी फेल होण्याची जोखीम वाढते. जास्त मीठ लघवीद्वारे कॅल्शियम कमी करते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात.
४. मिठाचे सेवन कोणी कमी करावे?
• उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, हृदयाचे विकार, ऑस्टिओपोरोसिस किंवा पोटात अल्सर असलेल्या व्यक्तींनी मिठाचे सेवन कमी करावे. ज्येष्ठ नागरिकांनीही मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
• रक्तदाब कमी करणारी काही औषधे मूत्राद्वारे अतिरिक्त मीठ काढून टाकून शरीरातील मिठाचे प्रमाण कमी करतात. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा उच्च कोलेस्टेरॉल असेल तर हृदयविकार, किडनीचे नुकसान आणि स्ट्रोक टाळण्यासाठी सोडियमचे सेवन कमी करणे महत्त्वाचे आहे. मिठाचा जास्त वापर केल्याने ऑस्टियोपोरोसिस त्रास वाढतो.
५. सर्वात चांगले मीठ कोणते आहे ?
तुमच्याकडे टेबल मिठाचा पर्याय आहे. ज्यात काळे मीठ, सागरी मीठ, हिमालयीन गुलाबी मीठ, सेल्टिक समुद्री मीठ आणि पोटॅशियम मीठ, उच्च रक्तदाबासाठी सर्वोत्तम मीठ म्हणजे पोटॅशियम मीठ आणि सेल्टिक मीठ आहे.
६. सेंधे मीठ म्हणजे काय ?
• यात सोडियम क्लोराईडबरोबरच बरेच ट्रेस मिनरल्स असतात. यात मोठे जाड दगड असतात. त्यावर प्रक्रिया केली जात नाही. यात सोडियमची मात्रा टेबल मिठाच्या तुलनेत कमी असते. सेंधे मिठात २० ते २५ सोडियम असेल तर टेबल मिठात ९९ टक्के असते.
• सेंधे मिठात नैसर्गिकरीत्या आयोडीन नसते. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखी मिनरल असतात. त्याची चव सौम्य असते. उपवास, आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक आहारासाठी या मिठाला प्राधान्य दिले जाते.
७. इतर क्षारांचे काय?
• हिमालयीन गुलाबी मिठामध्ये मिनरलवर आधारित मिठाचे प्रमाण कमी असते. टेबल मीठ किंवा रिफाइंड आयोडीनयुक्त मिठामध्ये ९९ टक्के सोडियम आणि आयोडीन कमी प्रमाणात असते. टेबल मिठामध्ये त्याच्या शुद्धतेमुळे सर्वांत जास्त सोडियम असते.
• लोडिन थायरॉइड ग्रंथीच्या आजारात प्रतिबंध करते. सेल्टिक समुद्री मिठात सोडियमचे प्रमाण कमी असणे ही मुख्य गोष्ट आहे. अति मिठामुळे उच्च रक्तदाब, किडनीचे आजार आणि हृदयाचे विकार होऊ शकतात.
दररोज ५ ग्रॅम किंवा १ चम्मचपर्यंतच
दररोज ५ ग्रॅम किंवा १ चम्मचपर्यंतच मीठ खावे. नैसर्गिक, कमी प्रक्रिया केलेले मीठ जसे की सेंधे मीठ किंवा हिमालयीन मिठामध्ये सोडियम कमी असते. आयोडीन आवश्यक आहे जे टेबल सॉल्टमध्ये वापरले जाते. स्वयंपाक करताना मीठ काळजीपूर्वक वापरा. जास्त मीठ घालण्याऐवजी औषधी वनस्पती, लिंबू आणि मसाल्यांनी चव वाढवा.
डॉ. जय देशमुख
एमडी, एफसीपीएस, एमएनएएमएस
healthlibrary@lokmat.com
jmdlokmat@gmail.com