Join us

घाटेअळीचा हरभरा पिकावर जोरदार हल्ला, कसे करावे व्यवस्थापन?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 12:00 PM

ढगाळ वातावरण राहिल्यामुळे हरभरा पिकावर मर, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

आठ दिवसांपूर्वी चार-पाच दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे हरभरा पिकावर मर, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यात घाटेअळीने हरभरा पिकावर जोरदार हल्ला चढवून पीक पूर्णपणे फस्त केले. त्यामुळे शेतकऱ्याने १७ एकरांत लावलेल्या पिकावर नांगर फिरवला.

केज तालुक्यातील माळेगाव, सर्डी भागातील १७ एकर हरभऱ्याच्या शेतीवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. अवकाळी पावसाच्या आधी पेरणी झालेल्या हरभरा पिकात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे लंब उगवून आले. तसेच तणही उगवले. तण व्यवस्थापन तसेच कीड रोग औषध फवारणी करूनही हरभरा पिकात सुधारणा होत नव्हती. दुबार पेरणीच्या उद्देशाने माळेगाव व सुडर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी १७ एकर हरभरा पिकात ट्रॅक्टर फिरवून पीक मोडून टाकले आहे. परिणामी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. रब्बी हंगामसुद्धा धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी वाढत आहेत. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी दुष्टचक्रात शेतकरी सापडताना दिसत आहेत.

हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या (कट वर्म) किडीचे ओळख व व्यवस्थापन

नुकसानग्रस्तांना मदत द्यावी

  • घाटे अळीने हरभऱ्याचे शेंडे खाऊन अख्खे पीक फस्त करून टाकले.
  • नाइलाजाने दुबार पेरणीच्या उद्देशाने माळेगाव येथील संतोष गव्हाणे यांनी ८ एकर, सुर्डी येथील नरसिंह कुपकर ३ एकर, जयचंद कुपकर २ एकर, सुभाष साळुंके २ एकर, पंकज भिसे २ एकर, बापू भिसे अर्धा एकर या शेतकऱ्यांनी हरभरा पीक मोडून टाकले.
  • शासनाने नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
टॅग्स :हरभरापीकपीक व्यवस्थापन