Join us

Heavy Rain Damage : साहेब नुसते पंचनामे नको ; ठोस मदत करणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 3:10 PM

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु आहेत. (Heavy Rain Damage)

 Heavy Rain Damage :

छत्रपती संभाजीनगर : 

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २६ लाख ४९ हजार ५६६ शेतकऱ्यांचे २१ लाख १९ हजार ४१५ हेक्टरवरील खरीप पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले. 

आजवर यातील १९ लाख ८५ हजार ६६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या १६ लाख ५४ हजार ७३६.८१ हेक्टरवरील नुकसानीचे ७८.०८ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर व बीड हे दोन जिल्हे मागे असून या जिल्ह्यात ४५ टक्के पंचनामे झाल्याचे आकडेवारीतून दिसते. 

नांदेड जिल्ह्यातील ५ लाख ३२ हजार ९९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. परभणीत बाधित क्षेत्र ३ लाख ५१ हजार ५७८ हेक्टर, हिंगोलीतील २ लाख ८६ हजार १४४, लातूर १ लाख ९५ हजार ७५४, जालना २ लाख १२ हजार ४६६, छत्रपती संभाजीनगर १ लाख ७७ हजार ७१५, बीड जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ६९१ तर धाराशिव जिल्ह्यातील ६ हजार ६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. अतिवृष्टीमध्ये २० लाख ७१ हजार ९२१.८९ हेक्टरवरील कोरडवाहू, २६ हजार ३४९ क्षेत्रावरील बागायत तर २१ हजार १४४.३ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला.

कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान

जिल्हा  बाधित शेतकरीबाधित क्षेत्रपंचनामे झालेले क्षेत्र  टक्केवारी
छ. संभाजीनगर            ३१७४६८१७७७१५,०७  ७५३५४.०७    ४२.४०
जालना२५४१२७२१२४६६.७२१३९२५३.५१६५.५४
परभणी४५९०१२३५१५७८३४०४०८९६.८२
हिंगोली२८१६८८२८६१४४.३२८६१४४.३१००
नांदेड६८२२६४५३२९९९४६५२२४८७.२८
बीड३९७७५३३५६६९११५२३१०.०६४२.७०
लातूर२५०७१४१९५७५४,१०१९०७०६.८३९७.४२
धाराशिव६५४०६०६७५३३६८७.९५
एकूण२६४९५६६२११९४१५.१९१६५४७३६.८१७८.०८
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरीदुष्काळपाऊसमराठवाडा