Join us

दोन दिवसात १० मंडळात अतिवृष्टी; २८ गावातील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 5:28 PM

सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून, गेल्या दोन दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील दहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा शेती पिकावर काय परिणाम झाला वाचा सविस्तर

बुलढाणाः 

सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून, गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील दहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून मोताळा, खामगाव आणि लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

यामध्ये ३ हजार ४०५ शेतकरी बाधित झाले आहे. तर २५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊसही जिल्ह्यात दमदार बरसत असून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २३.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यात सर्वाधिक असा ६०.७ मि.मी. पाऊस पडला असून, लोणार तालुक्यात ५१.६ मि.मी. पाऊस पडला आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सक्रीय झाला असून, २५ सप्टेंबर रोजी तुळजापूर, सिंदखेड राजा आणि जनुना या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती.

गुरुवारी मेरा (७६.३), शेलगाव (९१.३), देऊळगाव राजा (७८.३), दे. राजा ग्रामीण (७०.५), लोणार (८१.८), टिटवी (७२.८), हिरडव (७०.३ मिमी) या प्रमाणे अतिवृष्टी नोंदविल्या गेली आहे. या पावसामुळे मोताळा, खामागाव आणि लोणार तालुक्यातील कापूस, मका आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

खडकपूर्णाचे सात दरवाजे उघडले; १२६९१ क्युसेक वेगाने विसर्गदेऊळगाव मही :  खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पातून १२ हजार ६९१ क्युसेक अर्थात ३५९ क्युमेक वेगाने सात दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

त्यामुळे बुलढाणा, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ९३.४० दलघमी जलसाठा असून, एकूण क्षमतेच्या ९९.०७ टक्के हा जलसाठा आहे.

बुधवारी सायंकाळी प्रारंभी दोन दरवाजांतून व नंतर रात्री १० वाजता १८ दरवाजांतून जवळपास तीन तास पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर हे दरवाजे बंद करण्यात आले होते.

पहाटे ५ वाजेच्या सुमारास पुन्हा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार सध्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये पाऊस झालेला असल्याने धरणातपाण्याची आवक वाढली होती.

प्रामुख्याने मराठवाड्यातील भोकरदन, सिल्लोड, जाफ्राबाद तालुक्यांत हा दमदार पाऊस झाला होता. त्यातून प्रकल्पात अचानक पाण्याची आवक वाढली.

त्यामुळे धरण परिचन सूचीच्या नियमानुसार प्रकल्पाचे एकूण सात दरवाजे उघडण्यात येऊन त्यातून १२ हजार ६९१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पाण्याची चिंता मिटली

■ खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असल्याने देऊळगाव राजा, सिंदखेड राजा शहरासह लगतच्या गावांतील पाण्याचा प्रश्न मिटला असून, उन्हाळ्यात या भागात पाणीटंचाईची तीव्रता राहण्याची शक्यता कमी आहे. त्यातच देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यातील नदीकाठच्या ४४ गावांचाही पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये पाणी आरक्षण समितीची बैठक होत आहे. त्यात मराठवाड्यातील जाफ्राबाद, भोकरदन व सिल्लोडसह अन्य गावांच्या पिण्याच्या पाण्याचेही आरक्षण खडकपूर्णावरून होणार आहे.

जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली

सप्टेंबर महिना संपण्यास अद्यापही तीन दिवस बाकी असतानाचा बुलढाणा जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. २६ सप्टेंबर रोजीच जिल्ह्यात सरासरीच्या १०१.८८ टक्के पाऊस पडला आहे.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मि.मी. पाऊस पडतो. त्यातुलनेत २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ७७५.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील १३ पैकी सहा तालुक्यांनीही पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली असून, यात देऊळगाव राजा तालुक्यात आतापर्यंत १०६.७३ टक्के, खामगावमध्ये १०८.१९ टक्के, शेगावमध्ये १२६.९३, मलकापूरमध्ये ११७.३३, मोताळा ११०.१५ आणि जळगाव जामोद तालुक्यात १४८.१९ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सरासरी किंवा सरासरीपेक्षा काही प्रमाणात अधिक पाऊस पडणार असल्याचे भाकित खरे ठरले आहे.असे झाले आहे नुकसान

तालुका गावे  बाधीत शेतकरी बाधीत क्षेत्र (हेक्टरमध्ये)
मोताळा८           ९१८      १०९५
खामगाव ६                         १०७९१
लोणार

१४           

२३८०१०७०
एकूण २८                   ३४०५    २२५६
टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसबुलडाणाशेतकरीशेती