Lokmat Agro >शेतशिवार > मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

Heavy rains hit 22 lakh 48 thousand 445 farmers in Marathwada | मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. विभागात ३९.६५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. विभागात ३९.६५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. विभागात ३९.६५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. ७ लाख २० हजार हेक्टरवरील पंचनामे झाले असून, ११ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे अद्याप शिल्लक आहेत.

मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांचे १८ लाख ५ हजार ८६२ हेक्टरवरील खरीप पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. यात १७ लाख ५६ हजार ८८९ हेक्टरवरील जिरायत, २७ हजार ८६३ क्षेत्रावरील बागा, तर २१ हजार ११० हेक्टरवरील फळबागांना पावसाचा तडाखा बसला.

नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ९९३ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ५७८ हेक्टर, हिंगोलीतील २ लाख ८१ हजार ६७९ हेक्टर, लातूरमधील २ लाख ६ हजार ६१४, तर जालना २ लाख १२ हजार ५६९, छत्रपती संभाजीनगर १ लाख ७६ हजार ९३६, बीडमध्ये १ लाख १८ हजार ४२५, तर धाराशिव जिल्ह्यात ६ हजार ६७ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्हाबाधित शेतकरीबाधित क्षेत्रपंचनाम्याचे क्षेत्रपंचनाम्याची टक्केवारी
छ. संभाजीनगर३१६०५९१७६९३६.०७२९२६५२०.५३
जालना२४५७८४२१२५६९.३२५९८४७.१६१५.४३
परभणी४५९०१२३५१५७८२२९००७.३६८५.०५
हिंगोली२८१६७९२८१६८८१९८५१७.५६७.३८
नांदेड५८८२५३४५१९९३५८३४३१३.२६
बीड१०८५३७११८४२५.८०२७६१५.८३२३.७८
लातूर२४२५७२२०६६१४.१०६३६५६.१३३.८२
धाराशिव६५४०६०६७६०६.७१.२५
एकूण२२४८४४५१८०५८६२.२९६६६८५८.६५३९.६५ 

हेही वाचा - Farmer Success Story : मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतीला सेंद्रिय जोड देत आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशकथा

Web Title: Heavy rains hit 22 lakh 48 thousand 445 farmers in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.