Join us

बुलढाणा जिल्ह्यात १३ मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतकरी हतबल; प्रशासनाच्या मदतीकडे डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 7:25 PM

पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी साचले असून, कापूस, तूर, मका, सोयाबीन, उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे

गेल्या तीन दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे १४५ गावांतील ११ हजार ६०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान बुलढाणा, शेगाव आणि मोताळा तालुक्यातील १३ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १४ टक्के पाऊस अधिक झाला आहे.

पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी साचले असून, कापूस, तूर, मका, सोयाबीन, उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील ४८ हेक्टर जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९०.५२ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडत असतो. आतापर्यंत ६८९.४ मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. अतिवृष्टीमुळे मोताळा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून त्या खालोखाल चिखली तालुक्यात, खामगाव, नांदुरा, बुलढाणा, मेहकर आणि लोणार तालुक्यात नुकसान झाले आहे. दरम्यान, बैल धुण्यास गेलेल्या मलकापूर तालुक्यातील दोन व मोताळा तालुक्यातील एकाचा पुराच्या पाण्यात बडून मुत्यू झाला आहे.

या मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी

बुलडाणा, शेगाव आणि मोताळा या तीन तालुक्यांतील १३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये बुलढाणा (६९.५०), धाड (७५.८०), पाडळी (१०१.५०), देऊळघाट (७२.५०), शेगाव (९३.५०), माटरगाव (७०,३०), जलंब (८७.३०), जांभूळ धाबा (९६.३०), धामणगाव बढे (८१), रोहीणखेड (१३३.३०), पिंपळगाव देवी (८१), नांदुरा (१०५,५०), निमगाव (७४.३० मिमी) या मंडळांत ही अतिवृष्टी झाली आहे.

तालुकानिहाय पिकांचे झालेले नुकसान

तालुकाबाधित गावेशेतकरी संख्याबाधीत क्षेत्र (हेक्टरमध्ये)
बुलढाणा८  ७५० ३५०
चिखली३२ ४२५०२१५०
मोताळा ३१२९७५  ४६२०
खामगाव२५ ४०००१७००
शेगाव२०                    १५०० ९५०
नांदुरा १८                २८०० १२००
मेहकर६  ३६३ ३७९
लोणार          ५   ५८७२६०
एकूण १४५२६४२५ १९६०९

४ तालुक्यात २६ घरांचे नुकसान !

बुलडाणा, मोताळा, संग्रामपूर आणि खामगाव तालुक्यातील ७ गावांमध्ये २६ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. खामगाव व मोताळा तालुक्यातील छोटी १३७ आणि एक मोठे अशी एकूण १२८ गुरे दगावली आहेत. दरम्यान, प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून अंतिम अहवाल बाकी आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसशेतकरी