Join us

हिंगोलीतील तीन मंडळांत अतिवृष्टी, शेतकऱ्यांमध्ये पावसामुळे समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 1:00 PM

खरीप पिकांना दिलासा

हिंगोली जिल्ह्यात रविवारी रात्री विविध भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी पहाटेपर्यंत झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील तीन मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३८.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन ऐन बहरात असताना पावसाने दगा दिला. काही प्रमाणात सोयाबीनला या पावसाचा फायदा झाला असला तरीही अनेक ठिकाणी सोयाबीन यलो मोझॅकला बळी पडले आहे. पावसाची असलेली गरज काही प्रमाणात भरून निघाली. सोमवारी सकाळी ८ वाजेपूर्वीच्या २४ तासांत सरासरी यात हिंगोली ५२.३०, कळमनुरी ४१.१०, वसमत ३१.२०, औंढा नागनाथ ५६.४०, तर सेनगाव तालुक्यात १४.४०मिमी पावसाची नोंद झाली आहे. पर्जन्याची टक्केवारी हिंगोली ८१.२१, औंढा ना. ९४.४८, सेनगाव ७२.०२ अशी आहे.मंडळनिहाय असा झाला पाऊस

मंडळनिहाय हिंगोली ९९.३ मिमी, नर्सी ३४ मिमी, सिरसम २३.८ मिमी, बासंबा ५९.३ मिमी, डिग्रस कन्हाळे ७१.८ मिमी, माळहिवरा ४३, खांबाळा ४३, कळमनुरी ३९.८, वाकोडी २२.५, नांदापूर ६२, आखाडा बाळापूर ३०.८, डोंगरकडा ४८, वारंगा फाटा ४३.५. वसमत १२.८, आंबा ४६.३, हयातनगर १२.८, गिरगाव ६३.३. हट्टा २५. टेंभूर्णी १५.५. कुरुंदा ४२.८, औंढा नागनाथ ५१.३, येहळेगाव सोळंके ७१.८, साळणा ५१.३, जवळा बाजार ५१.३. सेनगाव १७.५, गोरेगाव १३.५, आजेगाव १३.५, साखरा १४.५, पानकनेरगाव १०.३, हत्ता १७ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोलीला पावसाने झोडपले

रविवारी रात्री साडेदहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत हिंगोलीत सलग मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर काही वेळ विश्रांतीनं पुन्हा मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याचे दिसत होते. रात्रभर पावसाची रिपरिप सुरु असल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :पाऊसहिंगोलीहवामानशेतकरीपीकखरीप