Join us

नुकसानीनंतर ७२ तासांत तक्रार केली तरच मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 10:17 AM

पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास उलटले तरी शेतात पाणी साचलेले आहे किवा नुकसानीपर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे, तर शासनाकडून पीक पंचनामा झाल्याशिवाय मदत मिळणार नाही.

शेतकऱ्याला शासकीय मदत पदरात पाडून घ्यावयाची असेल तर नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आतमध्ये नुकसानीचा दावा तो ही ऑनलाइन करायचा आहे. मात्र, पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास उलटले तरी शेतात पाणी साचलेले आहे किवा नुकसानीपर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे, तर शासनाकडून पीक पंचनामा झाल्याशिवाय मदत मिळणार नाही. शिवाय पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीही वेगळ्याच असतात. साचलेल्या पाण्यामुळे शेतामध्येच प्रवेश करता येत नाही, त्यामुळे नुकसानीचा दावा करावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

या पाच पद्धतीने नोंदवता येणार तक्रार- शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्स अॅप यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्वतः भरायची आहे, याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.विमा कंपनीने १८००४१९५००४ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात.- तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाइनही तक्रार करू शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॉर्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.- ज्या बँकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.- शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचे विमा कंपनीला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून म्हणजे ऑनलाइन किंवा ऑफलाइन हे कळवावेच लागणार आहे.

नुकसानीचा दावा न केल्यास काय होणार?- सध्या ओढवलेल्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा नुकसानीचा दावा करू शकला नाही तर काय होणार. यावर पीक विमा कंपनाने काय पर्याय काढला आहे का? तर याचे उत्तर आहे असा कोणताही पर्याय शेतकऱ्यांकडे नाही.- नुकसानीच्या दाव्याशिवाय शेतकऱ्याला मदत मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचे विमा कंपनीला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून म्हणजे ऑनलाइन किंवा ऑफलाइन हे कळवावेच लागणार आहे.

काय चित्र आहे गावशिवारातग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अॅपद्वारे तक्रार नोंदवण्याची तांत्रिक माहिती नाही. त्यामुळे ज्या तरुणाला याचे ज्ञान अवगत आहे त्या तरुणाकडून अॅपद्वारे माहिती भरून नुकसानभरपाईसाठी पात्र होण्यास शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

पिक पेरणीपासून काढणीच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, दुष्काळ पावसातील खंड, पूर. क्षेत्र जलमय होणे, किड व रोगाचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपिट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. - जगदीश पाटील, कृषी उपसंचालक, नाशिक

टॅग्स :पीकशेतकरीपाऊसपीक विमादुष्काळमोबाइलशेतीसरकार