Lokmat Agro >शेतशिवार > तणनाशके फेरपालट आणि तण नियंत्रण

तणनाशके फेरपालट आणि तण नियंत्रण

Herbicide rotation and weed control | तणनाशके फेरपालट आणि तण नियंत्रण

तणनाशके फेरपालट आणि तण नियंत्रण

पिक उत्पादनात मशागातीपासून ते काढणीपर्यंत तण नियंत्रण महत्वाचा घटक आहे. पीकनिहाय वेगवेगळ्या प्रकारची तणे आढळतात. सद्यस्थितीत तणनाशके फवारली तरीही तण नियंत्रण होत नाही असे दिसत आहे अशावेळी तणनाशकांची फेरपालट करणे जरुरीचे ठरते.

पिक उत्पादनात मशागातीपासून ते काढणीपर्यंत तण नियंत्रण महत्वाचा घटक आहे. पीकनिहाय वेगवेगळ्या प्रकारची तणे आढळतात. सद्यस्थितीत तणनाशके फवारली तरीही तण नियंत्रण होत नाही असे दिसत आहे अशावेळी तणनाशकांची फेरपालट करणे जरुरीचे ठरते.

शेअर :

Join us
Join usNext

पिक उत्पादनात मशागातीपासून ते काढणीपर्यंत तण नियंत्रण महत्वाचा घटक आहे. पीकनिहाय वेगवेगळ्या प्रकारची तणे आढळतात. सद्यस्थितीत तणनाशके फवारली तरीही तण नियंत्रण होत नाही असे दिसत आहे अशावेळी तणनाशकांची फेरपालट करणे जरुरीचे ठरते. जशी आपण पिकाची फेरपालट करतो त्यामुळे मातीचा पोत उत्तम राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तणनाशकांचा फेरपालटीत वापर केला तर तणांस अटकाव होऊ शकतो.

तण नियंत्रणातील महत्त्वाचे घटक
१) जमिनीचा प्रकार
२) पाण्याची उपलब्धता
३) पिकांमधील अंतर आणि वाढीचा वेग
४) खत देण्याच्या पद्धती
५) मनुष्यबळाची उपलब्धता
६) पूर्वीचे आणि नंतरचे घेण्यात येणारे पिक
७) तणनाशकांबद्दलचे ज्ञान आणि कुशलता

तण नियंत्रणाचे प्रकार
१) पीक लागवड पद्धती: पिकांचा फेरपालट, जोमाने वाढणाऱ्या पिकांची निवड, खत आणि पाणी देण्याच्या पद्धती.
२) यांत्रिकी: खुरपणी, कोळपणी, नांगरणी इत्यादी
३) तण नाशकांचा वापर: पेरणीपूर्वी, पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी आणि पीक उगवल्यानंतर वापरण्यात येणारी तणनाशके
४) जैविक तण नियंत्रण: यात जैविक घटकांचा वापर करून तण नियंत्रण करू शकतो.

विविध पिकातील तण नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कालावधी
१) सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी - १५ ते ४५ दिवस
२) तूर आणि कापूस - १५ ते ९० दिवस
३) मूग आणि उडीद - पंधरा ते तीस दिवस
४) ऊस - तीस ते नव्वद दिवस
५) हळद आणि आले - तीस ते १२० दिवस

तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी
१) प्रत्येक वेळी पंप स्वच्छ धुणे आवश्यक.
२) निवडक तणनाशकांचा वापर करताना मात्रा आणि वेळ महत्त्वाची.
३) वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन फवारणी करणे आवश्यक.
४) पंपाची कार्यक्षमता तपासून तणनाशकांची मात्रा ठरवणे आवश्यक.
५) तणनाशकांच्या फवारणीसाठी डब्ल्यू एफ एन नोझलचा वापर करावा.

वरील सर्व बाबींचा विचार करून तणनाशकांचा वापर केल्यास तणांवर नियंत्रण आणू शकतो. शक्यतो तणनाशक जेवढी मात्रा दिली आहे तेवढीच वापरावे, एकच तणनाशक पुन्हा पुन्हा एकाच पिकात वापरले तर त्या तणनाशकाने तण नियंत्रण काहीश्या प्रमाणात कमी होताना दिसते आहे यात आपण तणनाशकांची फेरपालट केली तर नियंत्रणासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
 

Web Title: Herbicide rotation and weed control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.