देशातील ११ राज्यांमधील ४९ जिल्ह्यांमध्ये पामतेल वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात आली असून कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सात हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पाम वृक्षांची लागवड केली आहे.
भारतातील पाम तेलाची आयात जुलै महिन्याच्या तुलनेत ५९ टक्क्यांनी वाढून १.०८ दशलक्ष मॅट्रिक टनांवर पोहोचली आहे. ही आयात सात महिन्यांमधील सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी पामतेलाचे उत्पादन वाढवावे यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत पामतेल वृक्ष लागवडीची मोहीम राबवण्यात आली होती. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२३ रोजी या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात झाली होती. १२ ऑगस्टला या मोहिमेचा समारोप करण्यात आला.
'या' राज्यांमध्ये झाली पामतेल वृक्षाची लागवड
देशातील एकूण ११ राज्यांमध्ये पामतेल वृक्षांची लागवड झाल्याचे कृषिमंत्रालयाने सांगितले. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, कर्नाटक, मिझोराम, नागालँड, ओडीसा, तमिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा या प्रमुख पामतेल उत्पादक राज्यांमध्ये पामतेल वृक्षांची लागवड झाली.
वनस्पती तेलाचा भारत जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया मधून मोठ्या प्रमाणात पाम तेलाची आयात भारताने केली. खाद्यतेलाच्या एकूण बाजारपेठे पैकी 60 टक्के भागाकाम तेलाचा असून भारताच्या एकूण गरजेच्या केवळ २.७% एवढंच काम तेल उत्पादन भारतात होते.
भारतातील काम तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार आणि खाद्यातील उत्पादक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना लागवड, संवर्धन तसेच पामतेल बियांच्या काढणीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.