Lokmat Agro >शेतशिवार > कृषि विज्ञान केंद्र बारामती फळ रोपवाटिकेस सर्वोच्च थ्री स्टार मानांकन

कृषि विज्ञान केंद्र बारामती फळ रोपवाटिकेस सर्वोच्च थ्री स्टार मानांकन

Highest three star rating for Krishi Vigyan Kendra Baramati Fruit Nursery | कृषि विज्ञान केंद्र बारामती फळ रोपवाटिकेस सर्वोच्च थ्री स्टार मानांकन

कृषि विज्ञान केंद्र बारामती फळ रोपवाटिकेस सर्वोच्च थ्री स्टार मानांकन

शेतकरी यांच्या मागणीनुसार शेतकरी यांच्या शेतावर प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले जाते. ज्यामध्ये शेतकरी यांच्या बांधावर जावून पिक उत्पादन वाढ व येणाऱ्या अडचणी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते.

शेतकरी यांच्या मागणीनुसार शेतकरी यांच्या शेतावर प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले जाते. ज्यामध्ये शेतकरी यांच्या बांधावर जावून पिक उत्पादन वाढ व येणाऱ्या अडचणी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते.

शेअर :

Join us
Join usNext

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती अंतर्गत फळ रोपवाटिका मार्फत महाराष्ट्र व जवळील राज्यामध्ये मागणीनुसार गुणवत्ता पूर्ण कलमे व रोपे पुरविण्याचे काम करत आहे. सदर कलम रोपामध्ये आंबा, चिक्कू, पेरू, नारळ, सिताफळ, डाळिंब, जांभूळ, फणस, आवळा, चिंच, ई. फळपिके व त्यांच्या विविध शिफारशीत जाती शेतकरी यांच्या मागणीनुसार वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. सदर कलम रोपे के व्ही के येथील प्रक्षेत्र वर लागवड केलेल्या मातृवृक्ष पासून शास्त्रीय पद्धतीने तयार केली जातात. सदरील कलमे रोपे लागवडीसाठी के व्ही के प्रक्षेत्र येथे भेटीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. शिवाय शेतकरी यांच्या मागणीनुसार शेतकरी यांच्या शेतावर प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले जाते. ज्यामध्ये शेतकरी यांच्या बांधावर जावून पिक उत्पादन वाढ व येणाऱ्या अडचणी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते.

शेतकरी यांना चांगल्या गुणवत्तेची कलम रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी के व्ही के येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा संस्थेचे चेअरमन मा. राजेंद्र दादा पवार यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या फळपिकाची मातृवृक्ष रोपे, अत्याधुनिक यंत्रणा असलेले पाणी व खत प्रणाली, नियंत्रित वातावरणामध्ये कलमे तयार करणेसाठी उच्च दर्जाची पॉलीहाउस व मिस्ट चेंबर सुविधा, वायरस मुक्त कलम निर्मिती साठी इनसेक्ट नेट हाउस, कमी खर्चिक टनेल याप्रकारच्या अनेक व उपयुक्त सुविधा आहेत.

के व्ही के बारामती येथे दरवर्षी अडीच ते तीन लाख कलम रोपांची निर्मिती केली जाते. सदरील कलमे रोपे १५०० ते १६०० एकर क्षेत्रावर शेतकर्यांना लागवडीसाठी उपलब्ध केली जातात. यामध्ये शासकीय योजना, विविध एन जी ओ मार्फत वाटप, वैयक्तिक लागवड करिता कलम रोपे दिली जातात. संस्थेचे चेअरमन मा. राजेंद्र पवार यांचा भविष्यातील शेतीविषयक दृष्टीकोन व बदलती पिक पद्धती याबद्दल असलेली जागरूकता यामुळे के व्ही के बारामती प्रयत्नशील असते व यामुळे संस्थेच्या फळ नर्सरी करिता राष्ट्रीय बागवानी बोर्ड, गुरगाव, हरियाणा यांच्याकडून ३ स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.

राष्ट्रीय बागवानी बोर्ड, गुरगाव, हरियाणा मार्फत पूर्ण भारतामधून ८०६ नर्सरीचे मानांकन करण्यात आले.  ज्यामध्ये महाराष्ट्रमधील १५२ नर्सरी मानांकित करण्यात आल्या. देशभरातील एकूण नर्सरी पैकी १२ नर्सरीना गुणवत्तापुर्ण फळ पीक कलमे रोपे उत्पादन व विक्री करता सर्वोच्च ३ स्टार मानांकनाने सन्मानित करण्यात आले व यामध्ये महाराष्ट्र मधील फक्त दोन नर्सरीना ३ स्टार मानांकन मिळाले असून यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांचा समावेश आहे. गुणवत्तापुर्ण नर्सरी रोपे निर्मितीसाठी केंद्रामार्फत विषय तज्ञ श्री. यशवंत जगदाळे, श्री. संतोष करंजे, शेती व्यवस्थापक श्री. महेश जाधव, नर्सरी व्यवस्थापक श्री. अभिजीत जमदाडे प्रयत्नशील असतात. ट्रस्टचे चेअरमन श्री. राजेंद्र पवार, विश्वस्त श्री. विष्णुपंत हींगणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रोपवाटिकेची वैशिष्टये

- महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रमाणित आदर्श रोपवाटिका
- देशी खुंटावरील कलम रोपे
- उत्कृष्ट, उच्चतम गुणवत्ता व निवडक मातृवृक्ष पासून कलम रोपांची निर्मिती
- नवीन व सुधारित वाणांची लागवडीयोग्य कलम रोपे
- शास्त्रोक्त व सुधारित तंत्रज्ञानाने कलम रोपांची निर्मिती
- गुणवत्ता असलेली खात्रीशीर कलम रोपे
- कीड व रोग विरहीत कलम रोपांची निर्मिती
- शासकीय दरानुसार विक्री
- लागवडीपूर्व व पश्चात तज्ञाकडून संपूर्ण मार्गदर्शन

Web Title: Highest three star rating for Krishi Vigyan Kendra Baramati Fruit Nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.