Lokmat Agro >शेतशिवार > Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन 

Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन 

History of honey Bees | Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन 

Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन 

मधमाशांची जैवविविधतेत काय भूमिका असते? त्यांचा इतिहास, अधिवास आणि मुख्य म्हणजेच संवर्धन समजून घेणं आवश्यक आहे. 

मधमाशांची जैवविविधतेत काय भूमिका असते? त्यांचा इतिहास, अधिवास आणि मुख्य म्हणजेच संवर्धन समजून घेणं आवश्यक आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

'या भूतलावरून मधमाशा नष्ट झाल्या तर मनुष्यप्राणी चार वर्षांपेक्षा अधिक काळ जगू शकणार नाही.' असं महत्वपूर्ण वक्तव्य जगप्रसिद्ध शास्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी केल्याचं आढळतं. सद्यस्थितीत मधमाशांची घटती संख्या लक्षात घेता मधमाशी संवर्धनासाठी वेगवगेळ्या उपपयोजना राबविल्या जात आहेत. आगामी काळात यावर अधिक भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. नेमकं मधमाशांची जैवविविधतेत काय भूमिका असते? त्यांचा इतिहास, अधिवास आणि मुख्य म्हणजेच संवर्धन समजून घेणं आवश्यक आहे. 

मधमाशांची ओळख झाली... 

आज मधमाशी म्हटली की आपल्याला पहिल्यांदा तिचा डंख आठवतो. मात्र आज या व्यतिरिक्त मधमाशीद्वारे अनेक फायदे मिळत आहेत. आजच्या घडीला मधमाशीच्या असांख्य प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. फार पूर्वी म्हणजेच साधारण 1500 च्या दशकात मधमाशीची ओळख झाली. सुरवातीला थेट मध काढणे अवघड गेले. मात्र नंतर पोळ्याला काहीही न करता थेट मध काढता येण्याचा मार्ग सापडला. यासाठी मधुपेटी विकसित करण्यात आली. ज्याद्वारे थेट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्याजोगे साधन तयार झाले आणि मधही काढता येऊ लागले. 

मधमाशी पालनात क्रांती 

त्यानंतर मधाचे पोळे तर सहजासहजी ने आण करण्याची सोय झाली. मात्र मधमाशांची ओळख झाली होती, पोळ्यातून थेट मध काढणे सोपे झाले होते. मात्र थेट मधमाशीचे पालन करता येईल का? यावर संशोधन सुरु झाले. या संशोधनाला योग्य साधन मिळाल्याने प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने मधमाशीपालनाचा व्यवसाय सुरु झाला. याच सुमारास मधुपेटीची पोकडी न मोडता मध काढण्याचा यंत्रांचा शोध लागला. तसेच याच वेळी मधमाशांच्या मेणापासून मेणपत्रे बनविण्यास यश मिळाले. हे मेणपत्रे मधाला योग्य रीतीने बाहेर काढण्यास मदत करत असत. या शोधांमुळे मधमाशी पालनात नाविन्यता येत गेली. 


असं सांगितलं जातं .... 

इसवी सण 5 हजार वर्षांपूर्वी मधमाशांना पोळे करता यावे म्हणून नळ्यांचा उपयोग करण्यात येऊ लागला होता. या नळ्या साधारण लाकडाच्या साली किंवा ओंडके पोखरून केलेल्या असतं.  या नळ्यांवर गोड पदार्थ टाकण्यात येई. जेणेकरून मधमाशा आकर्षित होतील. यानंतर एक एक माशी करत असंख्य मधमाशा या नळीमध्ये जमा होत. यानंतर हळूहळू मधमाशांचे पोळे तयार होऊन मध मिळत असे. 

संवर्धन खूप महत्वाचं 

सुरवातीपासून मधमाशी पालनात मोठमोठे बदल होत गेले. मात्र सद्यस्थितीत मधमाशीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरण, प्रदूषण, धोकादायक वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमानात वाढते आहे. यामुळे निसर्गातील अनेक छोट्या मोठ्या घटकांना त्याचा सामना करावा लागत आहे.  
विशेषतः मधमाशी ही मानवी जीवनात मोलाचं योगदान देत असते. मधमाशांच्या उत्पादनात घट झाली तर अन्नधान्य उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक देशांना याचा फटका बसू शकतो. 


 

Web Title: History of honey Bees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.