Lokmat Agro >शेतशिवार > महिला शेतकऱ्यांचा सन्मान! 2026 हे वर्षे 'जागतिक महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित

महिला शेतकऱ्यांचा सन्मान! 2026 हे वर्षे 'जागतिक महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित

Honor women farmers 2026 has declared International Year Women Farmers | महिला शेतकऱ्यांचा सन्मान! 2026 हे वर्षे 'जागतिक महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित

महिला शेतकऱ्यांचा सन्मान! 2026 हे वर्षे 'जागतिक महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित

संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अश्मयुगीन काळापासून शेती व्यवसायातील महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला आहे. पण आता महिला शेतकऱ्यांना जगात ओळख मिळणार असून संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिला शेतकऱ्यांना सन्मान मिळणार असून त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळणार आहे. 

स्त्रिया पारंपारिक काळापासूनच शेतीमध्ये पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आल्या आहेत. देशातील धान्य आणि इतर पदार्थांच्या उत्पादनात महिलांचा वाटा हा ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. महिलांचे हे योगदान महत्त्वाचे असून अनेक महिलांच्या नावावर त्यांच्या हक्काची शेतजमीन नसते. संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयामुळे या महिलांच्या प्रश्नाला हात घातला जाणार आहे. 

दरम्यान, शेती व्यवसायातील शाश्वत विकासाची दिशा ठरवण्याचे काम या माध्यमातून केले जाणार असून  महिला शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर जगभरातील महिला शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि मालकी हक्क मिळण्यासाठी या निर्णयामुळे मदत होणार आहे. 

Web Title: Honor women farmers 2026 has declared International Year Women Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.