Lokmat Agro >शेतशिवार > कर्जतला भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

कर्जतला भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

Honoring the winners of Paddy Competition at karjat | कर्जतला भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

कर्जतला भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

भातपीक स्पर्धेत भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. सेंद्रिय उत्पादन असलेल्या तृणधान्यपासून बनविण्यात आलेल्या सरबत उत्पादनाचे लॉन्चिंग कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले.

भातपीक स्पर्धेत भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. सेंद्रिय उत्पादन असलेल्या तृणधान्यपासून बनविण्यात आलेल्या सरबत उत्पादनाचे लॉन्चिंग कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले.

शेअर :

Join us
Join usNext

कर्जत कृषी विभाग वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. या महोत्सवात ३५ हून अधिक स्टॉल्स लावण्यात आले होते, तर भातपीक स्पर्धेत भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. सेंद्रिय उत्पादन असलेल्या तृणधान्यपासून बनविण्यात आलेल्या सरबत उत्पादनाचे लॉन्चिंग कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले.

रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन कर्जत पंचायत समिती माजी सभापती सुषमा ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट, कर्जत नगर परिषद नगरसेवक संकेत भासे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, राजनाला समिती चेअरमन उत्तम शेळके, भात खरेदी- विक्री संघसंचालक चंद्रकांत मांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रवीण ओसवाल, अजित पाटील तसेच तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, सकस आहार तज्ज्ञ आणि कडाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा पाटील, संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आर. डी. साळवे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आर. डी. साळवे व डॉ. ऋतुजा पाटील यांनी रानभाज्यांबद्दल माहिती सांगितली. संकेत भासे यांनी, "ग्रामीण भागातील भाज्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. क्षीरसागर दाम्पत्याने तयार केलेले सरबत महाराष्ट्राच्या बाजारपेठेत कसे जाईल? हे पाहिले पाहिजे." असे सूचित केले. नितीन फुलसुंदर यांनीही मार्गदर्शन केले.

भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
या कार्यक्रमात भात पीक स्पर्धेतील मागील दोन वर्षांतील विक्रमी उत्पादन घेऊन क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
२०२१-२२
प्रथम
मारुती बाबू दुर्गे-नेवाळी
द्वितीय हरिचंद्र मागो बांगारे
तृतीय हरिच्चंद्रा दत्तू भागीत नेवाली

२०२२-२३
प्रथम
अनिल तुकाराम थोरवे गणेगाव
द्वितीय जयवंत दत्तू मते- फराटपाडा
तृतीय सूर्याजी रामा कडव-भानसोली

आदिवासी गट
मंगल गणपत हिंदोळा
राजेंद्र कृष्णा पादिर
रामा डामा दरवडा

Web Title: Honoring the winners of Paddy Competition at karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.