Lokmat Agro >शेतशिवार > फळझाडांची लागवड करताय? 'इथे' मिळतात विद्यापीठाची स्वस्त दरातील खात्रीशीर रोपे

फळझाडांची लागवड करताय? 'इथे' मिळतात विद्यापीठाची स्वस्त दरातील खात्रीशीर रोपे

hosticulture cultivation Planting fruit trees 'Here' get sure plants of the university at cheap prices | फळझाडांची लागवड करताय? 'इथे' मिळतात विद्यापीठाची स्वस्त दरातील खात्रीशीर रोपे

फळझाडांची लागवड करताय? 'इथे' मिळतात विद्यापीठाची स्वस्त दरातील खात्रीशीर रोपे

शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये खात्रीशीर फळांची झाडे उपलब्ध होणार आहेत. 

शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये खात्रीशीर फळांची झाडे उपलब्ध होणार आहेत. 

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : पावसाळ्यामध्ये अनेक शेतकरी फळझाडांची लागवड करत असतात. मनरेगा योजनेच्या अंतर्गत शेतकरी फळबागांची लागवडही जून, जुलै महिन्यात करत असतात. पण शेतकऱ्यांना अनेकदा खात्रीशीर रोपे मिळण्यासाठी अडचणी येतात. रोपांमध्ये फसवणुकीलाही सामोरे जावे लागते. म्हणून विद्यापीठाकडून खात्रीशीर रोपांची विक्री करण्यात येते.

दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रामध्ये विविध फळझाडांची रोपे विक्रीसाठी उपलब्ध असून सकाळी ९ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत या रोपांची विक्री सुरू असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये खात्रीशीर फळांची झाडे उपलब्ध होणार आहेत. 

कोणत्या फळांची रोपे उपलब्ध?
येथे आंबा कलम, सिताफळ कलम, डाळिंब, पेरू कलम, अंजीर कलम, नारळ रोपे, कागदी लिंबू, गुलछडी फूल कंद आणि अॅस्टरचे बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या फळझाडांमध्ये विविध वाणेसुद्धा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीचे होणार आहे. 

किती आहेत दर?
रोपांचे नाव - वाण - दर

आंबा कलम - केसर, अभिरूची, हापूस - ८० रूपये
सिताफळ कलम - फुले पुरंदर - ५० रूपये
डाळिंब - भगवा, सुपर भगवा - ३० रूपये
पेरू कलम - सरदार (एल - ४९) - ६० रूपये
अंजीर कलम - पुना फिग, फुले राजेवाडी - ४० रूपये
नारळ रोपे - बाणवली, प्रताप - १२० रूपये
कागदी लिंबू - साई सरबती, फुले सरबती - ३५ रूपये
गुलछडी फूल कंद - फुले रजनी, फुले रजत (प्रती कंद) - ४ रूपये
अॅस्टरचे बियाणे - गणेश फुले पिंक, निळा व पांढरा - ८००० रूपये प्रतीकिलो

ज्या शेतकऱ्यांना वरील रोपे खरेदी करायचे आहेत अशा शेतकऱ्यांनी राहुरी येथील कृषी विद्यापीठातून किंवा पुण्यातील गणेशखिंड येथे असलेल्या कृषी संशोधन केंद्रातून रोपे खरेदी करावेत. 
रोपे खरेदी करण्यासाठी संपर्क - ०२०२९९९९०६७
विक्री वेळ - सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० पर्यंत

Web Title: hosticulture cultivation Planting fruit trees 'Here' get sure plants of the university at cheap prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.