Join us

फळझाडांची लागवड करताय? 'इथे' मिळतात विद्यापीठाची स्वस्त दरातील खात्रीशीर रोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 8:41 PM

शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये खात्रीशीर फळांची झाडे उपलब्ध होणार आहेत. 

पुणे : पावसाळ्यामध्ये अनेक शेतकरी फळझाडांची लागवड करत असतात. मनरेगा योजनेच्या अंतर्गत शेतकरी फळबागांची लागवडही जून, जुलै महिन्यात करत असतात. पण शेतकऱ्यांना अनेकदा खात्रीशीर रोपे मिळण्यासाठी अडचणी येतात. रोपांमध्ये फसवणुकीलाही सामोरे जावे लागते. म्हणून विद्यापीठाकडून खात्रीशीर रोपांची विक्री करण्यात येते.

दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रामध्ये विविध फळझाडांची रोपे विक्रीसाठी उपलब्ध असून सकाळी ९ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत या रोपांची विक्री सुरू असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये खात्रीशीर फळांची झाडे उपलब्ध होणार आहेत. 

कोणत्या फळांची रोपे उपलब्ध?येथे आंबा कलम, सिताफळ कलम, डाळिंब, पेरू कलम, अंजीर कलम, नारळ रोपे, कागदी लिंबू, गुलछडी फूल कंद आणि अॅस्टरचे बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या फळझाडांमध्ये विविध वाणेसुद्धा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीचे होणार आहे. 

किती आहेत दर?रोपांचे नाव - वाण - दर

आंबा कलम - केसर, अभिरूची, हापूस - ८० रूपयेसिताफळ कलम - फुले पुरंदर - ५० रूपयेडाळिंब - भगवा, सुपर भगवा - ३० रूपयेपेरू कलम - सरदार (एल - ४९) - ६० रूपयेअंजीर कलम - पुना फिग, फुले राजेवाडी - ४० रूपयेनारळ रोपे - बाणवली, प्रताप - १२० रूपयेकागदी लिंबू - साई सरबती, फुले सरबती - ३५ रूपयेगुलछडी फूल कंद - फुले रजनी, फुले रजत (प्रती कंद) - ४ रूपयेअॅस्टरचे बियाणे - गणेश फुले पिंक, निळा व पांढरा - ८००० रूपये प्रतीकिलो

ज्या शेतकऱ्यांना वरील रोपे खरेदी करायचे आहेत अशा शेतकऱ्यांनी राहुरी येथील कृषी विद्यापीठातून किंवा पुण्यातील गणेशखिंड येथे असलेल्या कृषी संशोधन केंद्रातून रोपे खरेदी करावेत. रोपे खरेदी करण्यासाठी संपर्क - ०२०२९९९९०६७विक्री वेळ - सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० पर्यंत

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीलागवड, मशागत