विदर्भात ग्रामीण भागात तुरीच्या सोले वांगी भाजीची घरोघरी चांगलीच धूम सुरू झाली आहे. अशात अवकाळी पावसामुळे काही भागातील तूर शेंगा पूर्णतः भरली नसून येणाऱ्या काही दिवसात गुलाबी थंडीत सोले भाजीची धूम राहणार आहे. त्यामुळे गृहिणीचा काही कालावधीसाठी तरी जेवणात भाजीचे टेन्शन मिटले आहे.
शेतशिवारात तुरीचे पीक बहरु लागते. तुरीच्या झाडावरील पिवळीधम्म फुलोरा पाहून गावखेड्यासह शहरवासीयांनाही वेध लागतात; मात्र
यावर्षी अवकाळी पावसामुळे अनेक भागात बहार गळून पडला. तर शेंगा भरायला देखील वेळ लागत आहे. तुरीच्या शेंगातील ओल्या दाण्यांच्या भाजीला ग्रामीण भागात चांगली मागणी आहे. त्यास सोले म्हटले जाते. सध्या ग्रामीण भागात घरोघरी गृहिणी भाजीत तुरीच्या सोल्यांना प्राधान्य देत असून खवय्ये सोल्यांच्या भाजीसह रोडग्याचा मेजवानीला सुरुवात झाली आहे. सध्या तुरीच्या सोल्यापासून विविध तयार होत असलेल्या मेन्यूना प्राधान्य दिले जात आहे.
सोले वांगी, सोल्याचे कड़ी गोळे, शिजवलेल्या शेंगा, सोले आणि हिरवी मिरची वाटून भाजी, इत्यादी नवनवीन भाजी याच वेळी मिळत असल्याने या सिझनमध्ये आनंद वेगळाच तसेच भाजीसाठी काही आणा हा प्रश्न सध्या तरी पडत नाही. सुलोचना सहारे गृहिणी यामुळे घरोघरी तूर सोल्यांच्या भाजीची धूम असल्याचे दिसून येते. गृहिणीतर्फे तुरीच्या दाण्यांची वेगवेगळ्या प्रकारे भाजी केली जाते. जात पाटावर वाटून केलेली पातळ भाजी, सोले वांगी, कढीगोळे, फोडणी दिलेली टोमॅटो टाकून केलेली चटणी, नुसते दाणे भाजून केलेली चटणी, कोबी, टोमॅटो, वांगी मिश्रीत भाजी, सोले भात यासह मीठ टाकून उकळलेल्या शेंगा, सोबत सोले टाकून भरलेली कचोरी अशा नानात-हेच्या आहाराचा वापर होतो.