Join us

जम्मू काश्मीरचे शेतकरी उच्च कृषी तंत्राचा वापर कसा करत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 3:29 PM

जम्मू आणि कश्मीरचे शेतकरी आता सजग होत नव्या युगाचे उच्च कृषी तंत्रज्ञान वापरत असून अनेक शेतकऱ्यांनी ठिंबकसारख्या प्रणालीचा वापर करून शेतीमध्ये चांगले उत्पादन काढले आहे.

जम्मू आणि कश्मीरचे शेतकरी आता सजग होत नव्या युगाचे उच्च कृषी तंत्रज्ञान वापरत असून अनेक शेतकऱ्यांनी ठिंबकसारख्या प्रणालीचा वापर करून शेतीमध्ये चांगले उत्पादन काढले आहे.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेतकरी अब्दुल अहद सोफी. त्यांच्या सफरचंद बागेत, बडगाम, जम्मू आणि काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील सफरचंदाच्या शेतात त्यांनी यंदा ठिबकचा वापर करून चांगले उत्पादन मिळवले आहे.

अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील कृषी पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (SKUAST-Kashmir) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

प्रदेशातील शेतकऱ्यांना स्मार्ट, तंत्रज्ञान-आधारित उपाय देण्यासाठी या सामंजस्य करारावर SKUAST-काश्मीरचे कुलगुरू, प्रोफेसर नजीर अहमद गनई आणि जैन हिल्स, जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहसंचालक अजित जैन यांनी अलीकडेच स्वाक्षरी केली आहे.

यांच्यातील भागीदारीचे उद्दिष्ट अत्याधुनिक सिंचन तंत्र आणि शाश्वत शेती पद्धती सादर करणे आहे, जे या प्रदेशातील भौगोलिक आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार केले आहे.

या सहकार्यातून शेतीतील दीर्घकालीन शाश्वतता आणण्यासाठी पाणी व्यवस्थापन सुधारणे, लागवड साहित्य विकसित करणे, पीक उत्पादन वाढवणे, हवामान स्मार्ट तंत्रज्ञान उपाय आणि काटेकोर शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित होणार आहे.

त्यामुळे येथील शेतकऱ्यांनाही आता आधुनिक शेती करणे सहज शक्य होत आहे. त्यासाठी येथील शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीजम्मू-काश्मीरठिबक सिंचनतंत्रज्ञान