Join us

कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकाची कंट्रोल रूम कशी चालते? कसे सोडवले जातात शेतकऱ्यांचे प्रश्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 6:02 PM

राज्य सरकारने खरिप हंगामात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि व्हाट्सअप क्रमांक उपलब्ध करून दिला होता. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कसे काम केले जाते त्यासंदर्भात...

पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून खरिप हंगामात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे आणि तक्रारींचे निरसन करण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर  व्हाट्सअप क्रमांकसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला असून त्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचे कंट्रोल रूममधून निरसन केले जाते. 

दरम्यान, पुणे येथील कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातील अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली या कंट्रोल रूमचे काम चालते. टोल फ्री क्रमांक आणि व्हाट्सअपच्या द्वारे दिवसभरात जवळपास ३० ते ३५ शेतकऱ्यांचे फोन आणि तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. 

शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची माहिती आणि त्याची तक्रारीचा गुगल फॉर्म भरला जातो. त्यानंतर ही माहिती संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पाठवली जाते आणि तक्रारीसंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्यात येतात. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लवकर सोडवल्या जातात. 

कोणत्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येतात?

  • पीक विमा मिळाला नाही
  • बियाणे उपलब्ध नाही
  • खते उपलब्ध नाहीत
  • अनुदान का मिळत नाही
  • एखाद्या विषयावर विद्यापीठाचे मार्गदर्शन मिळावे
  • खते, बियाणे जास्त दरात विक्री होतात

दरम्यान, कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या खरिप हंगामात २७ जून अखेर ४३९ तक्रारी आल्या असून त्यातील २२१ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. तर बाकीच्या तक्रारीवर काम सुरू असल्याची माहिती आहे.  

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी