Pune : राज्यात खरिपाच्या पेरण्या जोरात सुरू आहे. मान्सूनचा चांगला पाऊस धरणातील पाण्याची चांगली स्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलावा याबाबीचा विचार करून कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी नियोजन केले आहे.
खरीप अन् मान्सूनचा आढावा१ जून ते १६ ऑक्टोबर २०२४ पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत ११६% पाऊस पडला. जून महिन्यात १०७ %. जुलै महिन्यात १४६ %, ऑगस्ट महिन्यात २१%, सप्टेंबर महिन्यात ११६% आणि १६ ऑक्टोबर अखेर ११६ %. टक्के पाऊस पडला आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये एकूण पेरणी १४५.८१ लक्ष हेक्टर (सरासरीच्या १०३ टक्के) झाली. खरिपात यंदा खरीप पिके मका, उडीद, सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
रब्बी हंगामातील पिकाखालील राज्याचे एकूण सरासरी क्षेत्र ५३.९८ लक्ष हेक्टर आहे. यात पिके हरभरा २१.५२ लक्ष हेक्टर, गहू १०.४९ लक्ष हेक्टर व ज्वारी १७.५३ लक्ष हेक्टर एवढे क्षेत्र असणार आहे.
रब्बी हंगाम २०२३ मध्ये पिकनिहाय उत्पादकता ही ज्वारी १०३३.६८ किलो प्रतिहेक्टर (४२% वाढ), गहू १८९९.२४ किलो प्रतिहेक्टर (१४ % वाढ), मका २५३७.५७ किलो प्रतिहेक्टर (४% घट), हरभरा १०५५.११ किलो प्रतिहेक्टर (७% वाढ), करडई ७७१.२५ किलो प्रतिहेक्टर (३६ % वाढ) एवढी होती.
रब्बीचे नियोजनरब्बी हंगाम सन २०२४-२५ एकूण सरासरी क्षेत्र ५३.९८ लक्ष हेक्टर असून व चालू वर्षाचे असे एकूण ५९.९८ (११०%) लक्षांक ठेवला आहे. रब्बी हंगामासाठी बियाण्यांची आवश्यकता १०.४१ लाख क्विंटल असून एकूण बियाणे उपलब्धता १२.४८ लाख क्विंटल आहे (१२०% बियाणे उपलब्ध आहे.) रब्बी हंगामातील बियाणे बदल प्रमाण लक्षांक हा ज्वारी २२%, गहू ३७ %, मका १०० %. हरभरा ३३%, करडई ४५ % एवढा आहे.
रब्बी हंगामातील खतांचा सरासरी वापर (मागील ३ वर्षांची सरासरी)- २४.६६ लक्ष मे.टन आहे. चालू हंगामासाठी खतांची मागणी ३१.५० लक्ष मेट्रीक टन असून केंद्र सरकारकडून खतांचे मंजूर आवंटन ३१.५० लक्ष मेट्रीक टन आहे. तसेच, मागील हंगामातील खतांचा साठा १७.४४ लक्ष मेट्रिक टन इतका आहे.
रब्बी हंगामात सुधारित बियाण्यांचा पुरवठा करण्यावर भर देण्यात येत आहे. रब्बी हंगामातील पिक प्रात्यक्षिकांसाठी उपलब्ध बियाणे
- हरभरा ८०,१८९ क्विंटल
- गहू ४०६९ क्विंटल
- रब्बी ज्वारी ५०,५४७ क्विंटल
- करडई २६६६ क्विंटल
- जवस ६२५ क्विंटल
असे एकूण १ लाख ४० हजार ८९७ क्विंटल बियाणे अनुदानावर पुरवठा होणार आहे.
नविन वाणांचे मिनी कीट (संख्या)- रब्बी ज्वारी ४ लाख ८५ हजार ५०० हरभरा १२ हजार ३५० मसूर ५० हजार असे एकूण ५ लाख ४७ हजार ८५० मिनी किट उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
पिक विविधीकरण- कापूस, सोयाबीन व भात काढणीनंतर लगेचच हरभरा पिक घेतल्यास ४.५० लक्ष हेक्टर क्षेत्र कडधान्याखाली वाढू शकते.
तेल बिया - भात पिकानंतर ०.५० लक्ष हेक्टर क्षेत्र वाढविण्याचे नियोजन आहे. उन्हाळी भात (०.२५ लक्ष हेक्टर), रब्बी पिके (१.०० लक्ष हेक्टर) असे एकूण १.७५ लक्ष हेक्टर क्षेत्र तेलबिया पिकांखाली वाढविण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.