Join us

फळपिकांत कलम कसे केले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 3:53 PM

नवीन संकरित जाती निर्माण करण्यासाठी, कलमांचे खुंट तयार करण्यासाठी व पपयासारख्या एकदल पिकांच्या (उदा. नारळ, सुपारी इत्यादी) अभिवृद्धीसाठी बियांचा वापर आवश्यक ठरतो.

फळझाडांची अभिवृद्धी बियाणांपासून केल्यास अशी झाडे उंच वाढतात व फळे धरण्यास अधिक कालावधी लागतो. तसेच त्यापासून मातृवृक्षासारखी चांगली फळे व उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे औषध फवारणी, छाटणी, फळांची काढणी इत्यादी कामे खर्चिक व त्रासदायक होतात. त्यामुळे फळझाडांची लागवड कलमे लावून करतात. तथापि, नवीन संकरित जाती निर्माण करण्यासाठी, कलमांचे खुंट तयार करण्यासाठी व पपयासारख्या एकदल पिकांच्या (उदा. नारळ, सुपारी इत्यादी) अभिवृद्धीसाठी बियांचा वापर आवश्यक ठरतो. कलमे तयार करण्याच्या विविध पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

गुटी कलमया पद्धतीमध्ये पेरू, जाम, चेरी, दालचिनी इत्यादी फळझाडांची अभिवृद्धी केली जाते. यासाठी ४० ते ५० सेंटीमीटर लांब वाढलेल्या फांदीवर टोकापासून ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावर १.५ सेंटीमीटर रुंदीची पूर्ण साल काढून घ्यावी. त्यानंतर तेथे ओले शेवाळ लावावे आणि ते प्लॅस्टिक कापडाने गुंडाळून दोन्ही टोकाकडे सुतळीने बांधून घ्यावे. पावसाळ्यात गुट्या चांगल्या प्रकारे होतात. सुमारे अडीच ते तीन महिन्यात या गुट्यांमधून मुळे बाहेर दिसू लागतात. तेव्हा गुट्या झाडापासून कापून प्लॅस्टिक पिशव्यात लावून सावलीत ठेवाव्यात. नंतर गुटीवरील ५० टक्के पाने कमी करावीत. या पद्धतीत ७० ते ८० टक्के यश मिळते. लवकर व अधिक प्रमाणात मुळ्या फुटण्यासाठी आयबीए किंवा एनएए ही संजीवके २००० ते ५००० पीपीएम टाल्क पावडरमध्ये किंवा लॅनोलीन पेस्टमध्ये मिसळून गुटीच्या वरच्या कापावर लावावे.

कोय कलमआंब्याच्या अभिवृद्धीसाठी कोय कलम ही साधी व सोपी पद्धत असून, मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे तयार करता येतात. एका वर्षात ही कलमे लागवडीसाठी तयार होतात. या पद्धतीत ५० टक्के यश मिळते. यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य आहे. या पद्धतीत गादीवाफ्यावर कोयी रुजवून १५ ते २० दिवसांचे रोप मुळासकट कोयीसह काढून घ्यावे. अशा रोपांची पाने पूर्ण उघडलेली नसावीत. पाने व देठांचा रंग तांबडा असावा. रोपाचा खालचा ७ ते ९ सेंटीमीटरचा भाग ठेवून शेंडा छाटावा. आंबा कलमांची शाखीय वाढ अधिक सुदृढ होण्यासाठी कलमे २५ बाय ३५ सेंटीमीटर आकाराच्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. नवीन वाढणाऱ्या फुटीला काठ्यांनी आधार द्यावा.

व्हिनिअर कलमया पद्धतीत ८ ते १० महिने वयाची रोपे खुंट म्हणून वापरतात. या खुंटावर एका बाजूस सुमारे सेंटीमीटर उंचीवर ५ ते ७ सेंटीमीटर लांबीचा तिरकस उभा काप घ्यावा. या कापाची खोली खुंटाच्या जाडीच्या एकतृतीयांपेक्षा जास्त नसावी. नंतर या कापाच्या खालच्या टोकास थोडासा आडवा, तिरकस काप घेऊन साल, आतील भाग काढून घ्यावा, नंतर मातृवृक्षाच्या काडीवर सुमारे १५ सेंटीमीटर उंचीवर एका बाजूने ५ ते ७ सेंटीमीटर आकाराचा तिरकस काप द्यावा, ही फांदी खुंटावर दिलेल्या कापावर व्यवस्थित बसवून घ्यावी. या कापाची खोली फांदीच्या १/२ जाडीपेक्षा जास्त असू नये.

टॅग्स :फळेपीकशेतीशेतकरी